आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Encyclopedia Of Social Customs In The Country Is Dr. Pandurang Kane's Book 'Dharmashastra Ka Itihas'

इतिहासकार डॉ. काणे यांचा आज जन्मदिन:देशातील सामाजिक रीती-नियमांचा ज्ञानकोश म्हणजे डॉ. पांडुरंग काणे यांचा ‘धर्मशास्त्र का इतिहास’ ग्रंथ

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासाच्या मांडणीसाठी मानवाने सुरुवातीपासून प्रयत्न केल्याचे दिसते. त्यात भूतकाळाला क्रमबद्ध पद्धतीने मांडून त्यास वर्तमानात आणणाऱ्यांमध्ये इतिहासकारांचे मोठे योगदान राहिले आहे. अशाच व्यक्तींमध्ये डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा समावेश होतो. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी गौरव मिळवणारे काणे हे देशातील एकमेव व्यक्ती ठरले आहेत. त्यांना हा गौरव ‘धर्मशास्त्र का इतिहास’ या पुस्तकाच्या लेखनाबद्दल मिळाला होता. डॉ. पांडुरंग काणे यांचा जन्म ७ मे रोजी झाला. त्यांच्या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यात प्राचीन भारत, भारतातील सामाजिक नियम, कायद्यांपासून रीती-रिवाज यांचे संकलन दिसून येते.

आजच्या काळात या पुस्तकाला भारताच्या सामाजिक नियमांचा ज्ञानकोश असे संबोधले जाते. भारताच्या सामाजिक क्षेत्रातील संशोधनासाठी जगभरातील संशोधक त्यांच्या पुस्तकाचा आधार घेतात. या ग्रंथाचे पाच खंड आहेत. त्यात एकूण ६ हजार ५०० पाने आहेत. हा ग्रंथ भारतच नव्हे तर जगभरातील निवडक ग्रंथांमध्ये समाविष्ट होतो. हा ग्रंथ साकारण्यासाठी डॉ. काणे यांना तीस वर्षे अथक परिश्रम करावे लागले होते. डॉ. काणे यांच्या ‘धर्मशास्त्र का इतिहास’ च्या नावे आणखी एक विक्रम आहे. भारतात संस्कृतमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिलेच पुस्तक आहे. चार खंडांचे लेखन पूर्ण झाल्यानंतर काणे यांना साहित्य अकादमीद्वारे गौरवण्यात आले होते.

आधी डॉ. काणे यांना हा ग्रंथ लिहायचा नव्हता
डॉॅ. काणे यांना हा ग्रंथ लिहिण्याची इच्छा नव्हती. त्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. परंतु अन्य एका ग्रंथाच्या प्रस्तावनेसाठी सामग्री संकलित केली. तेव्हा हा विषय एवढ्या मर्यादित स्वरूपात मांडला जाऊ शकत नाही, असे वाटल्याचे काणे यांनी नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...