आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमध्ये पिलाईचे कॅथोलिक पाद्री जोसेफ कालारंगाट यांच्या मुस्लिमविरोधी लव्ह जिहाद व नार्कोटिक जिहादसंबंधी वक्तव्यानंतर किनारपट्टीवरील राज्यात राजकीय वादळ उठले आहे. सत्ताधारी डावी आघाडी व काँग्रेसने हे वक्तव्य समाजात दुही निर्माण करणारे असल्याची प्रतिक्रिया दिली. भाजपने मात्र या वक्तव्यास पाठिंबा दिला आहे. केरळमध्ये यावरून नवे राजकीय समीकरण आकारास येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये दोन प्रकारच्या विचारसरणींचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ व डाव्यांची एलडीएफ. एका धार्मिक सभेत पाद्री कालारंगाट यांनी भारतात दोन प्रकारचे जिहाद असल्याचे म्हटले होते. लव्ह जिहादमध्ये मुस्लिम तरुण हिंदू मुलींशी बळजबरीने विवाह करून त्यांना दहशतवादाच्या मार्गावर सोडतात. नार्कोटिक जिहादमध्ये आइस्क्रीम पार्लर, हाॅटेल, ज्यूस काॅर्नर चालवणारे मुस्लिम लोक गैर मुस्लिमांना ड्रग्ज इत्यादीचे व्यसन लावतात. पाद्री यांचे वक्तव्य सोशल मीडियावर आल्यानंतर गदाराेळ वाढला आहे. मुस्लिम समुदाय व इतर काही समुदायांनी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षणतज्ज्ञ निशिम मन्नाथुकरेन म्हणाले, धार्मिक विविधता असलेले राज्य केरळमध्ये पहिल्यांदाच एखाद्या धर्मगुरूने अशा प्रकारचे विधान केले आहे.
केंद्र सरकारने पाद्रींच्या वक्तव्याची दखल घ्यावी
राज्यसभा सदस्य व भाजप नेते सुरेश गाेपी म्हणाले, केंद्र सरकारने पाद्रींच्या वक्तव्याची दखल घ्यायला हवी. साेबतच केंद्राने या दिशेने कारवाई करायला हवी. भाजप व संघाशी संबंधित नेत्यांनी पाद१री कालारंगाट यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
कॅथाेलिक चर्चचा संबंध नाही : ख्रिश्चन धर्मगुरू
ख्रिश्चन धर्मगुरूंनी संयुक्त वक्तव्य जाहीर केले आहे. पाद्री कालारंगाट यांचे वक्त्यव्य तथ्याधारित नाही. पाद्री यांच्या विराेधात निदर्शने हाेत आहेत. ख्रिश्चन धर्मगुरू म्हणाले, या वक्तव्यातून कॅथाेलिक व गैर कॅथाेलिक ख्रिश्चन समुदायाच्या भावनांचे प्रतिबिंब पाहायला मिळत नाही.
काँग्रेस : दोन समुदायांत वैमनस्याचा प्रयत्न
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफनुसार पाद्री यांचे वक्तव्य केरळमधील मुस्लिमांत वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पाद्री यांच्या वक्तव्याला तथ्यांचा आधार नाही. पाद्री व त्यांच्या समर्थकांना या आराेपांसाठी आवश्यक पुरावे सादर करता आले नाहीत.
केरळमधील विविध धर्मानुयायी
ख्रिश्चन 18.4%
सायरो मालाबार 38.2%
लॅटिन कॅथोलिक 15.2%
केरळ विधानसभा निवडणूक 2021
मुस्लिम 26.6%
सु्नी 93.8%
शिया 6.2%
हिंदू 54.7%
इडवा 40%
नायर 22%
अजा/अजजा 17%
धर्म, ड्रग्ज दाेन्ही वेगवेगळे; विविध समुदायातील लोकांवर गुन्हे : मुख्यमंत्री विजयन
मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, सरकारी आकड्यांच्या आधारे धर्म व अमली पदार्थ यांचा काहीएक संबंध नाही हे स्पष्ट होते. या दाेन्ही वेगवेगळ्या गाेष्टी आहेत. लव्ह जिहाद, नार्काेटिक जिहाद यांचा संबंध नाही. २०२० मध्ये नार्काेटिकच्या प्रकरणात ४९ टक्के हिंदू, ३४ टक्के मुस्लिम, १५ टक्के ख्रिश्चन समुदायाच्या लाेकांवर गुन्हे दाखल आहेत. ड्रगशी संबंधित धर्मांतराचे काेणतेही प्रकरण समाेर आले नाही. केरळमधील १०० लाेकांनी इसिसचे सदस्यत्व घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.