आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Establishment Of The Eastern State Is The Cause Of The Yogi Delhi Tension; Yogi Will Meet Modi Today

उत्तर प्रदेशचे राजकारण:पूर्वांचल राज्याची स्थापना हेच योगी-दिल्ली तणावाचे कारण! विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपीचे विभाजन ?

दिनेश जोशी | गांधीनगर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात ताणतणाव वाढल्याची चर्चा आहे. राजकीय क्षेत्रात याकडे यूपीत नेतृत्व परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असले तरी मूळ कारण वेगळेच आहे. सूत्रांनुसार, पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपीचे विभाजन करून वेगळे पूर्वांचल राज्य निर्माण करण्यावर भाजप नेतृत्व विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय व माजी नोकरशहा ए. के. शर्मा यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यामागे हाच उद्देश असल्याचे मानले जाते. शर्मा सध्या पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाचे व्यवस्थापन पाहत आहेत.

काहींच्या मते, पूर्वांचल राज्य स्थापन झाले तर योगींचा गोरखपूर मतदारसंघ नव्या राज्यात जाईल. १९९८ ते २०१७ पर्यंत योगी येथे खासदार होते. योगी गोरक्षपीठाचे महंतही आहेत. याचे केंद्र गोरखपूरच आहे. पूर्वांचलमध्ये २३ ते २५ जिल्हे आणि १२५ विधानसभा जागा समाविष्ट असू शकतात. मात्र, या प्रस्तावास योगी समर्थकांचा विरोध आहे. पूर्वांचलसह अवध प्रदेश, बुंदेलखंड आणि पश्चिम प्रदेशात उत्तर प्रदेशचे विभागणी करण्याचा प्रस्ताव मायावती यांच्या कार्यकाळात २०११ मध्ये केंद्राला पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावर नंतर कधीच विचार झाला नाही.

राजधानी दिल्लीत राजकीय भेटीगाठींचा सिलसिला वाढला
आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. काँग्रेस नेते जितिन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी योगींचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोदींची भेट घेतली. अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनीही शहा यांची भेट घेतली. यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी १२ जूनपर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...