आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Executive Director Of The Serum Institute Said The Government Ignored Vaccine Stocks And WHO Guidelines.

व्हॅक्सिनची कमतरता:सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक म्हणाले- सरकारने व्हॅक्सिन स्टॉक आणि WHO च्या गाईडलाईन्सकडे दुर्लक्ष केले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या बर्‍याच भागात लसीची कमतरता असल्याच्या बातम्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी एक मोठे विधान केले आहे. देशातील कोरोना लस काेविशील्डची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी लसीच्या कमतरतेसाठी सरकारला जबाबदार सांगिलते आहे. ते म्हणाले की, सरकारने लसीकरण मोहिम वाढवताना लसींचा उपलब्ध साठा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइन्सचा विचार केला नाही.

सुरवातीला 30 कोटी लोकांचे लसीकरण होणार होते
एका कार्यक्रमादरम्यान जाधव म्हणाले की, भारत सरकारने डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊनच लसीकरण कार्यक्रमात लोकांना प्राधान्य देणे आवश्यक होते. ते म्हणाले की, सुरुवातीला 30 कोटी लोकांना लस दिली जाणार होती, त्यासाठी 60 कोटी डोसची आवश्यकता होती.

टार्गेट पूर्ण होण्यापूर्वीच...
ते म्हणाले की, आम्ही टार्गेट पूर्ण करण्याआधीच सरकारने 45+ वयोगटातील सर्व लोकांचे लसीकरण तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु केले. आमच्याकडे लसींचा एवढा साठा नसल्याचेही सरकारला माहित होते. यावरून आपल्याला एक शिकवण मिळते की, उत्पादनाची उपलब्धता लक्षात घेऊन ती योग्यरित्या वापरली पाहिजे.

लसीकरणानंतरही दक्षता आवश्यक आहे: जाधव
जाधव म्हणाले की, लसीकरण आवश्यक आहे परंतु लस घेतल्यानंतर लोकांना संसर्ग होत आहे. म्हणून लोकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. लसीकरणानंतरही लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. ते म्हणाले की, व्हॅक्सिन व्हेरिएंटच्या डबल म्युटंटवरदेखील प्रभावी आहे. तरीही व्हेरिएंट लसीकरणात अडचणी आणू शकतो.

बातम्या आणखी आहेत...