आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Family Carried The Dead Snake To Bring The Girl Back To Life, Latest News And Update

टोटक्यामुळे मृत मुलगी जिवंत होईल?:कुटुंब मेलेला साप घेऊन गावभर फिरले, टोटक्याने मुलगी जिवंत होण्याची होती आशा

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात सर्पदंशामुळे एका मुलीचा मृत्यू झाला. तिचे कुटुंबीय तिला चावलेल्या सापाला ठार केले व तो घेऊन थेट वैद्यबुवाकडे गेले. पण तरीही मुलीचे प्राण वाचले नाही. एखाद्या टोटक्यामुळे मुलगी पुन्हा जिवंत होईल, असे त्यांना वाटत होते. यासाठी त्यांनी दिवसभर मेलेला साप आपल्याजवळ बाळगला. पण मुलगी काही जिवंत झाली नाही.

भोजपूरच्या चांदी पोलिस ठाणे हद्दीतील सालेमपूर गावात ही घटना घडली. येथे शुक्रवारी भाला साव यांच्या 12 वर्षीय मुलीला सर्पदंश झाला. मृत्यूनंतर तिचे कुटुंब तिला घेऊन रुग्णालयात पोहोचले. तिथे शवविच्छेदन होईपर्यंत त्यांनी मेलेला साप आपल्याजवळ ठेवला. हा साप पाहण्यासाठी मोठा जमाव गोळा झाला होता.

मृत मुलीचे चुलते जटा साव यांनी सांगितले की, नीजू घरात खेळत असताना तिला एका विषारी सापाने दंश केला. यामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला उपचारासाठी आराच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्यामुळे तिला घरी आणण्यात आले. पण घरी आल्यानंतर काही तासांतच तिची प्रकृती पुन्हा बिघडली.

नीजू घरी खेळत असताना तिला विषारी सापाने चावा घेतला.
नीजू घरी खेळत असताना तिला विषारी सापाने चावा घेतला.

गावातील वैदाकडे नेताना मृत्यू

यावेळी कुटुंबीयांनी तिला जागे ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचारासाठी गावातील एका वैद्याकडेही नेले. पण रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने मेलेला साप घेऊन आराच्या रुग्णालयात पोहोचले. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

कुटुंबीय रुग्णालयात मृत मुलीसोबत सापही घेऊन आले होते.
कुटुंबीय रुग्णालयात मृत मुलीसोबत सापही घेऊन आले होते.

शवविच्छेदन होईपर्यंत साप बाळगला

कुटुंबीयांनी मृत मुलीचे शवविच्छेदन होईपर्यंत मेलेला साप फेकला नाही. जादुटोण्याने आपली मुलगी पुन्हा जिवंत होईल असा त्यांना विश्वास होता. पण तसे काहीच घडले नहाी. अखेर शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...