आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांच्या कुटूंबियाने तालिबान विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. दानिश यांचा गतवर्षी अफगाणिस्तान युद्धात मृत्यू झाला होता. त्यावेळी ते रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी कंदहारमध्ये वार्तांकन करत होते. तिथे अफगाण लष्कर व तालिबानमध्ये भयंकर युद्ध सुरु होते.
तालिबानवर आरोप
तालिबाने दानिश यांची अत्यंत निघृणपणे हत्या केल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला होता. त्यांच्या शरिरावर अनेक जखमा होत्या. तालिबानने त्यांना जीवंत पकडले होते. त्यांनी त्यांची ओळखही जाहीर केली होती. पण, त्यानंतर अनपेक्षितपणे तालिबानी अतिरेक्यांनी दानिश व त्यांच्या सहकाऱ्यांची हत्या केली.
तालिबानने हत्येचा आरोप फेटाळला
दुसरीकडे, तालिबानने दानिशच्या हत्येचा आरोप फेटाळला आहे. तालिबानने म्हटले- दानिशचा मृत्यू क्रॉस फायरिंगमध्ये झाला. त्यांनी या वार्तांकनासाठी परवानगी घेतली नव्हती. आम्ही अनेकदा पत्रकारांना युद्धग्रस्त भागात वार्तांकन करताना पूर्वपरवानगी घेण्याची सूचना केली होती. त्यांनी असे केले असते तर आम्ही त्यांना सुरक्षा पुरवली असती, असे ते म्हणाले.
दिल्लीचे होते दानिश
पुलित्झर पुरस्कार प्राप्त 38 वर्षीय दानिश दिल्लीचे रहिवाशी होते. त्यांनी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियातून अर्थशास्त्राची पदवी घेतील. त्यानंतर 2007 साली त्यांनीन पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यांच्या मागे पत्नी व 2 मुले आहेत. ते 2010 पासून रॉयटर्ससाठी काम करत होते.
2018 मध्ये मिळाला होता पुलित्झर पुरस्कार
रोहिंग्या शरणार्थींशी संबधित फोटोग्राफीसाठी 2018 मध्ये रॉयटर्सच्या टीमने पुलित्झर पुरस्कार जिंकला होता. या टिममध्ये सिद्दीकी यांचा समावेश होता. त्यांनी दिल्ली दंगलही कव्हर केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.