आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 28 वा दिवस आहे. रविवारी रात्री चर्चेच्या निमंत्रणासाठी सरकारने पाठवलेल्या पत्रावर शेतकरी गेल्या दोन दिवसांत निर्णय घेऊ शकले नाहीत. मंगळवारी कुंडली सीमेवर पंजाबच्या शेतकरी नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर सरकारशी चर्चा करायची की नाही, याबाबत संयुक्त मोर्चाचे सदस्य बुधवारी निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना भारतात येण्यापासून रोखण्याचे आवाहन करतील शेतकरी शेतकरी नेते कुलवंत संधू म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्याचे ऐकत नाही तोपर्यंत पंतप्रधान बोरीस जॉनसनला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही ब्रिटनच्या खासदारांना पत्र लिहित आहोत. दुसरीकडे शेतकऱ्यांचे उपोषणही सुरू आहे. दररोज 11 शेतकरी 24 तासांच्या उपोषणास बसले आहेत, तेथे दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर निदर्शने सुरू आहेत.
सरकारचा दावा - यूपीचे शेतकरी नेते आमच्या सोबत
कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर मंगळवारी म्हणाले, उत्तर प्रदेशमधील काही शेतकरी नेत्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी सरकारला नवीन कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. ते म्हणतात की कायदे बदलू नयेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.