आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात शुक्रवारी नवा खुलासा झाला. मुसेवालाच्या हत्येपूर्वीची एक कॉल रेकॉर्डिंग उजेडात आली आहे. त्यात एका अज्ञात व्यक्तीने मुसेवालाच्या वडिलांना 'तुमचा मुलगा चुकीचे बोलतो, त्याला समजून सांगा', अशी धमकी दिली होती. ही रेकॉर्डिंग खरी आहे की खोटी व केव्हाची आहे...याचा तपास पंजाब पोलिसांचा आयटी विभाग करत आहे.
सिद्धू मुसेवालानेही हत्येपूर्वी एक महिना अगोदर एका व्हिडिओद्वारे आपल्या कुटुंबियांचे फोन क्रमांक अनेक गुन्हेगारांपर्यंत पोहोचल्याचे व त्यांना धमकावण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय त्याच्या कार्यक्रमांच्या चौकशी क्रमांकावरही धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
फोनवर हा संवाद झाला होता...
- मुलाला समजून सांग, लाइव्हवर काहीच मिटणार नाही
धमकी देणाऱ्याने विचारले की मुसेवालाचे वडिल बलकौर सिंग बोलत आहेत का? त्यावर बलकौर सिंग म्हणाले -तुम्ही कोण बोलत आहात? धमकी देणारा म्हणाला -मुसेवाला समजून सांगा, लाइव्हवर काहीच मिटणार नाही. शिव्यांनी गोष्ट जमणार नाही. कुणी त्याच्या गावी आले तर तो आपल्या वृद्ध आईला पुढे करुन माफी मागण्यास सांगतो.
- मुसेवालाला गुंडगिरी शिकविली का?
बलकौर सिंग यांनी धमकी देणाऱ्यांना गावी येण्यास सांगितले. त्यावर धमकी देणारा म्हणाला -'गावात तर उंदीरही वाघ होतो. आपल्या गावात सर्वजण वाघ असतात. तू माझ्या गावी ये. मुसेवालाने लाइव्ह येऊन शिव्या देण्याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या मुलाला हेच शिकवले काय. त्याला चांगले शिकवा. धर्म व समुदायाबद्दल बोला.'
- नावे घेईल तेव्हा सोडणार नाही
बलकौर यांनी विचारले की मुसेवाला कुणाला वाईट बोलला, कुणाचे नाव घेतले? त्यावर धमकी देणाऱ्याने तो नाव घेईल त्या दिवशी त्याला सोडणार नाही असा इशारा दिला.
- मुसेवालाने माझा नंबर ब्लॉक केला
धमकी देणारा म्हणाला - 'कंपनीच्या क्रमांकावर मुसेवालाने माझा क्रमांक ब्लॉक केला. तो गुंडगिरीची भाषा करो. माझ्यावर संजय दत्त सारखी केस करण्याची धमकी देतो. त्याला टाडाची माहिती आहे.' एवढे ऐकल्यानंतर मुसेवालाचे वडील संताप व त्यांनी धमकी देणाऱ्यांना शिविगाळ केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.