आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Fifth Round Of Talks Between The Farmer Leaders And The Government Will Take Place Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलन:शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात आज पाचव्या फेरीतील चर्चा होणार; 7 डिसेंबरला पुरस्कार परत देणार, 8 ला भारत बंदची घोषणा

नवी दिल्ली/चंदीगड/टिकरी/कुंडली सीमाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली-यूपी हायवेवरच लंगर लावला होता. - Divya Marathi
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली-यूपी हायवेवरच लंगर लावला होता.

तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची सरकारशी शनिवारी चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासंदर्भात शुक्रवारी महापंचायत घेतली. तीत पुढील व्यूहरचनेबाबत तीन तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन बैठकांतून सरकारचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. दुरुस्तीच्या नावावर आम्हाला फसवण्याची इच्छा आहे. शनिवारी होणाऱ्या चर्चेत आम्ही सरकारला तिन्ही कायदे रद्द करणे आणि एमएसपीची हमी या मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलणार आहोत.शनिवारी देशभरात पंतप्रधान मोदींचे पुतळे जाळून विरोध केला जाईल, ७ डिसेंबरला पुरस्कार परत करण्याची मोहीम राबवली जाईल, अशी घोषणाही शेतकऱ्यांनी केली. ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ पाळण्याचेही जाहीर करण्यात आले.

सुप्रीम कोर्टात गेले प्रकरण
शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ऋषभ शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दिल्ली एनआरसीत कोरोनाचा धोका पाहता आंदोलकांना हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाल्याने कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. त्यामुळे त्यांना त्वरित हटवण्यात यावे, असे याचिकेत म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser