आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातेत शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठीचा प्रचार थंडावला.येथे सोमवारी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात व सौराष्ट्रात ६३.३१ टक्के मतदान झाले होते. ते २०१७ च्या तुलनेत ५.२० टक्के कमी होते. दुसऱ्या टप्प्यात मोदींचे शहर वडनगर व अमित शहा यांचे शअर मानसाही आहे. गेल्या निवडणुकीत दोन्ही जागी काँग्रेस विजयी झाली होती. आता भाजपने या जागा प्रतिष्ठेच्या केल्या. दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगरसह २५ जागा आहेत. जातीय समीकरण येथे महत्त्वाचे ठरेल. पाटीदार, ठाकोर, चौधरी, मुस्लिम व आदिवासीबहुल ४८ जागा आहेत. उत्तर गुजरातमध्ये माजी गृहमंत्री विपुल चौधरींची भ्रष्टाचार प्रकरणातील अटक मोठा मुद्दा ठरला होता. पण अमित शहांनी चौधरी, पाटीदार व इतर समाजाचे मन वळवून डॅमेज कंट्रोल केले.
तीन आंदोलक नेते मैदानात; हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेश २०१७ च्या निवडणुकीपूर्वी पाटीदार आंदोलन, दलित आंदोलन व दारूबंदी आंदोलनाने भाजपच्या अडचणींत वाढ झाली होती. पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल, दलित आंदोलनाचे जिग्नेश मेवाणी, दारूबंदीचे अल्पेश ठाकोर यांनी नेतृत्व केले होते. हार्दिक-अल्पेश भाजप तर जिग्नेश काँग्रेसचे उमेदवार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.