आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The First 5 Years Of Schooling Are Based On Pentagonal Development; Will Teach How To Pronounce, How To Breathe

दिव्य मराठी विशेष:शाळेची पहिली 5 वर्षे पंचकोष विकासावर आधारित; उच्चार कसा करावा, श्वास कसा घ्यावा हे शिकवणार

अनिरुद्ध शर्मा । नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय विद्यार्थ्यांची सुरुवातीची पाच वर्षे पंचकाेष विकासावर आधारित असतील. त्यासाठी शाळेतील पहिली पाच वर्षे संतुलित भाेजन, पारंपरिक खेळ, वयानुसार व्यायाम व याेग करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांना शाळेत याेग्य पद्धतीने श्वास कसा घ्यायचा हे याेगाद्वारे शिकवले जाणार आहे. त्यामुळे त्यांना पुरेशा प्राणवायू कसा घ्यायचा हे समजेल. यातून आवाजाचेही प्रशिक्षण मिळेल. शाळेत दरराेज वेगवेगळ्या प्रकारच्या गाेष्टी, गाणी, कविता, अंगाई गीते, प्रार्थना एेकवली जाईल. त्याद्वारे मुलांमध्ये केवळ संस्कृतीबद्दलचे प्रेमच नव्हे तर मूल्यांचेही बीजाराेपण हाेऊ शकेल. याद्वारे एकाग्रतादेखील साधता येईल. त्याशिवाय यामुळे इतर इंद्रियांचा विकासही हाेईल. शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून ही व्यवस्था लागू होईल. त्यासाठी एनसीईआरटीने आराखडा तयार केला आहे.

पंचकाेष विकास हेच याेगाचे मूळ मानवी अस्तित्व पाच भागात विभागले गेले आहे. त्याला पंचकाेष म्हटले जाते. याद्वारे चेतन, अचेतन मनाची अनुभूती होते. हे कोष परस्परांशी संलग्न आहेत. शिवाय त्यांचा परस्परांवर परिणाम देखील होतो, हे लक्षात घ्यावे.

अन्नमय कोष : यात शारीरिक विकासाशी संबंधित आहे. त्यात तंदुरुस्ती, लवचिकपणा, शक्ती, सहनशक्ती, इंद्रियांचा विकास समाविष्ट आहे. प्राणमय कोष : हे जीवन ऊर्जा विकासासंबंधी आहे. त्यास प्राणिक विकासही म्हटले जाते. श्वसन, पचन संस्थेच्या कार्याचा समावेश होतो. मनोमय कोष : मानसिक व भावनिक विकासाशी संबंध. नकारात्मकता इत्यादी भावनांचे संतुलन साधणे.संस्कृती, साहित्याकडे कल. विज्ञानमय कोष : ये हा बौद्धिक विकासाशी संबंधित आहे. रचनात्मकता, भाषिक कौशल्याचा यात समावेश होतो. आनंदमय कोष : अाध्यात्मिक विकासाशी संबंध. प्रेम, करूणा, सौंदर्य बौध, स्वत:ला जाणून घेण्याची भावना.

बातम्या आणखी आहेत...