आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The First Indigenous Vaccine For Children 12+ Can Arrive In 10 Days; Zydus Will Ask Cadilla For Permission For Emergency Use; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:12+ मुलांसाठी पहिली स्वदेशी लस 10 दिवसांत येऊ शकते; झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झायडस कॅडिलाला जानेवारी 2021 मध्ये मिळाली होती फेज-3 ट्रायलची परवानगी

देशवासीयांना लवकरच चांगली वार्ता कळणार आहे. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी पुढील दहा दिवसांत झायडस कॅडिला कंपनीकडून निर्मित लस १२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपनी झायडस कॅडिलाने तयार केलेली ही लस १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठीही उपयुक्त ठरेल. या लसीबाबत झायडसच्या वतीने उच्च सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून पुढील आठवड्यात ते आपल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यासंदर्भात अर्ज करणार आहेत.

कंपनी पुढील आठवड्यात करू शकते अर्ज, २ ते ३ दिवसांत मिळेल मंजुरी
झायडस कॅडिला कंपनीकडून तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निष्कर्षाबाबत सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला (सीडीएससीओ) माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सप्ताहात कोणत्याही दिवशी कंपनीकडून लसीच्या आपत्कालीन वापराबाबत परवानगी मागितली जाईल. अर्ज मिळाल्याच्या दोन-तीन दिवसांतच विषयतज्ज्ञ समिती (एसईसी) बैठक बोलावून कंपनीने सादर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या अहवालावर आपत्कालीन वापराला मंजुरी देऊ शकते. झायडस कॅडिलाच्या लसीचे सुरुवातीला ३ डोस असतील. मात्र, आगामी काळात ही लससुद्धा अन्य लसींप्रमाणे दोन डोसची बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. उच्चपदस्थ सरकारी सूत्रांच्या मते, कॅडिलाच्या लसीची किंमत अजून ठरली नाही. मात्र ती सर्वसामान्यांना परवडेल अशाच दरात असेल. कंपनीची प्रतिमहा एक कोटी डोस बनवण्याची क्षमता आहे.

१२ तेे १८ वर्षांची २६ कोटी मुले, अाजवर त्यांच्यासाठी नाही लस
कंपनीला जानेवारी २०२१ मध्ये तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाची परवानगी मिळाली होती. लसीचे २८ हजार लोकांवर परीक्षण करण्यात आले. डीएनए टेक्नॉलॉजीद्वारे बनवलेली ही पहिलीच लस आहे. १२ ते १८ वर्षांच्या मुलांची देशातील संख्या २५ ते २६ कोटींपर्यंत आहे. त्यांच्यासाठी आजवर देशात लस उपलब्ध नाही. फायझर अाणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला अनेक देशांत मुलांसाठी सुरक्षित मानले गेले. पण अद्यापही त्या भारतात उपलब्ध नाहीत.

बातम्या आणखी आहेत...