आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The First Monsoon Session Of The Parliament In Corona era From Today; Work Of Rajya Sabha In The Morning And Lok Sabha In The Afternoon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळी अधिवेशन:कोरोना काळातील संसदेचे पहिले अधिवेशन आजपासून; सकाळी राज्यसभेचे, तर दुपारी लोकसभेचे कामकाज

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 47 विधेयके मांडणार, प्रश्नोत्तराचा तास नाही

देशावर कोरोनाचे सावट गडद झालेले असतानाच संसदेचे १८ दिवसांचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होईल. त्यात अनेक गोष्टी बदललेल्या दिसतील. या वेळी दोन्ही सभागृहांचे कामकाज वेगवेगळ्या वेळी होईल. कोरोना तपासणीत निगेटिव्ह असलेल्या खासदारांनाच सभागृहात प्रवेश मिळेल. खासदार आणि कर्मचारी असे मिळून संसदेशी संबंधित ४,००० लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. प्रश्नोत्तराचा तास होणार नाही तसेच सदस्यांची खासगी विधेयकेही नसतील. मात्र, शून्य प्रहर असेल. अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकही झाली नाही. असे होण्याची ही दोन दशकांतील पहिलीच वेळ आहे. संसदीय कामकाज मंत्रालयानुसार अधिवेशनात ४७ विधेयके मांडली जातील. त्यापैकी ११ विधेयके अध्यादेशांची जागा घेतील. अधिवेशनाबाबत काँग्रेसने म्हटले आहे की, आमचा पक्ष अर्थव्यवस्था, कोरोना आणि सीमेवरील चीनची घुसखोरी या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरेल.

पहिल्या दिवशी राज्यसभा उपसभापतिपदाची निवडणूक

पहिल्याच दिवशी राज्यसभेत उपसभापतिपदासाठी निवडणूक होईल. विरोधकांतर्फे राजदचे नेते मनोज झा आणि सत्ताधारी रालोआतर्फे जदयूचे नेते हरिवंश यांच्यात लढत होईल, अशी अपेक्षा आहे.

तृणमूलचे सात आणि भाजपचे २ खासदार भाग घेणार नाहीत

अधिवेशनाआधी सर्व खासदारांची कोरोना चाचणी झाली. तीत पाच खासदारांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तृणमूल काँग्रेसचे सात खासदार अधिवेशनात भाग घेणार नाहीत. भाजपचे दोन खासदारही येणार नाहीत.

सकाळी राज्यसभेचे, तर दुपारी लोकसभेचे कामकाज

लोकसभेचे कामकाज पहिल्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, इतर दिवशी दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत होईल. राज्यसभेचे कामकाज पहिल्या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत असेल. नंतर रोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत होईल.

सामान्य लोकांच्या हिताच्या तरतुदी संपवू देणार नाही : रमेश

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, कृषीसंबंधी विधेयकात शेतकऱ्यांना किमान हमीभाव देण्याची व्यवस्था समाप्त करण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे बँकिंग विधेयकात बदल करून शेतकऱ्यांच्या कर्जात सूट देण्यासंबंधी अधिकार समाप्त करून सामान्यांच्या हितांचे नुकसान करणारी तरतूद आहे. त्यामुळे काँग्रेस या तिन्ही विधेयकांना जोरदार विरोध करेल. या विधेयकांना विरोध करण्यासाठी विरोधकांची एकजूट केली जात आहे.