आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The First Snowfall Of The Season In The Residential Areas Of Himachal; The Cold Snap Has Hit The Country Just Two Weeks Before Diwali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरेत गुलाबी थंडीचे आगमन!:हिमाचलच्या रहिवासी भागात हंगामातील पहिली बर्फवृष्टी; दिवाळीच्या 2 आठवड्यांआधीच देशात लागली थंडीची चाहूल

मनाली/ नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढे काय... उत्तरेकडून शीत वारे 72 तासांत मध्य भारतात दाखल

हिमाचलच्या रहिवासी भागांत निसर्गाने बर्फाची शुभ्र चादर अंथरली आहे. यासोबतच उत्तर भारतात हिवाळ्याचे आगमन झाले आहे. हवामान खात्यानुसार, पुढील १०-१२ दिवसांत बर्फवृष्टीची शक्यता नाही. मात्र, शुष्क हवेमुळे तापमानात वेगाने घसरण होईल. दक्षिण भारत वगळता देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशानी घटेल. डोंगराळ भागांतील बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात ७२ तासांत दिसेल. उत्तरेचे वारे मध्य व पश्चिम भारतापर्यंत पोहोचेल. यंदा हिवाळा दिवाळीच्या १४ दिवसांआधी आला. पर्वतराजींत दोन आठवड्यांपासून पारा घसरत असल्याने दिल्लीत यंदा ऑक्टोबर महिना ५८ वर्षांतील सर्वात गार ठरला. तेथे १९६२ नंतर ऑक्टोबरमध्ये सरासरी किमान तापमान १७.२ अंश होते. ते साधारणत: १९.१ अंश असते.

हवामान खात्याचे विभागप्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले, आकाशात ढग नसल्याने वेळेआधीच तापमानात घसरण पाहायला मिळत आहे. पुढील २ आठवड्यांपर्यंत काश्मीर, लडाख, हिमाचल व उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीचे शक्यता आहे. दाक्षिणात्य राज्ये वगळता देशातील इतर राज्ये शुष्क राहतील. तामिळनाडू, कर्नाटक व केरळात उत्तर-पूर्व मान्सून सक्रिय झाल्याने तेथे पाऊस पडत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेशात २ आठवड्यांपर्यंत आकाश निरभ्र असेल. यामुळे रात्रीपासून ते पहाटेपर्यंतच्या तापमानात सातत्याने घसरण होत राहील. स्कायमेटचे वैज्ञानिक महेश पालावत म्हणाले, पृथ्वीला दिवसभर सूर्याकडून ऊर्जा मिळते. मात्र पृथ्वी सूर्यास्तानंतर ऊर्जा सोडत असते. आकाशात ढग असल्यास ही ऊर्जा मध्येच ट्रॅप होऊन जाते. जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा पारा वेगाने घसरतो. ही स्थिती दोन आठवडे कायम राहील.