आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Foundation Of The Ram Temple Is Ready, Now Five Peaks 161 Feet High Will Be Erected

श्रीराम जन्मभूमी:राम मंदिराचा पाया तयार, आता 161 फूट उंच पाच शिखरे उभारली जाणार

अयोध्या/लखनौएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम जन्मभूमी मंदिराचा पाया तयार झाला आहे. ४०० बाय ३०० वर्ग फुटांवर तयार पायावर शिलांची भुकटी, बारीक शिलाखंड आणि सिमेंटच्या मिश्रणापासून तयार कृत्रिम पर्वतासाठी १८ महिने लागले. पुढील काही दिवसांत १.५ मीटर उंच काँक्रीटचा आणखी एक थर चढवला जाईल. त्यावर मिर्झापूरच्या गुलाबी दगडांपासून प्लिंथ केले जाईल.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर उभारणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यासाठी गाभाऱ्याच्या जागेवर १४ मीटर आणि अन्य जागांसाठी १२ मीटर मोठा पर्वत उभारला गेला. यातून एक थेंब पाणीही खाली जाणार नाही. हाच मंदिराचा मजबूत आधार आहे. मंदिराचा दुसरा टप्पा २ महिन्यांत पूर्ण केला जाईल.

दानात मिळाले ४ हजार कोटी, दरमहा १५ लाख देणगी
महासचिवांनी सांगितले की, रामजन्मभूमी मंदिर ३६० फूट लांब, २३५ फूट रुंद आणि १६१ फूट उंच असेल. मंदिर तीन ताळांचे असेल. भूतळात १६०, पहिल्या मजल्यात १३२ आणि दुसऱ्या मजल्यात ७४ खांब लागतील. मंदिरात एका मुख्य शिखरासह पाच उप शिखर आणि तितकेच मंडप असतील. तसेच एका मुख्यद्वारासह ११ उपद्वार असतील. मंदिर पूर्ण उभारल्यानंतर पावणेतीन एकर तथा मंदिराचा संपूर्ण परिसर ६.५ एकराचे होईल. रामजन्म भूमी ट्रस्टकडे सुमारे १०० एकराचा परिसर आहे. उल्लेखनीय म्हणजे देशभरातील रामभक्तांनी मंदिर उभारणीसाठी सुमारे ४ हजार कोटी दान दिले आहे. यात दरमहा १५ लाखांची भर पडत आहे.

बातम्या आणखी आहेत...