आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Foundation Of The Shriram Temple Was Excavated By Archeological Method Archaeologist K. K. Muhammad

अयोध्या:श्रीराम मंदिराचा पाया पुरातत्त्व पद्धतीने खोदा, 12 व्या शतकातील मंदिराची संरचना मिळेल, प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ के. के. महंमद यांचा दावा

लखनऊ / विजय उपाध्यायएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत ठरेल मंदिर बांधकामाचा रोडमॅप, 20 ऑगस्ट रोजी बैठक

श्रीराम जन्मभूमीचा पाया खोदताना प्राचीन इतिहासाची पाने उलगडण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ के. के. महंमद यांनी म्हटले, अयोध्येत जन्मस्थानाचा पाया पुरातत्त्व खात्याच्या पद्धतीनुसार खोदला गेला पाहिजे. याद्वारे सापडणाऱ्या अवशेषांना भावी पिढीसमोर ठेवता येईल. यामुळे त्यांना इतिहासाची माहिती व हे शास्त्र समजण्याची संधी मिळेल. ते म्हणाले, जन्मस्थळी सर्व पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची सामग्री समोर येण्याची शक्यता आहे. याचा उल्लेख २००३ च्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एएसआयच्या पथकाने आपल्या अहवालात केला आहे. पाया खोदताना १२ वे शतक व त्यापूर्वीच्या मंदिराप्रमाणे जन्मभूमीतून सापडलेल्या अवशेषांचे नव्या राम मंदिराच्या खाली संग्रहालय बनवून त्यात ठेवले जावेत. तरच संपूर्ण इतिहासासाठी हे मोठे यश ठरेल, असे त्यांनी म्हटले.

एएसआयच्या या अहवालाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशात करताना म्हटले होते की, मशीद रिक्त जागेवर बांधण्यात आलेली नव्हती. एएसआयचे महासंचालक बी. बी. लाल यांनी १९७६ मध्ये पहिल्यांदा राम जन्मभूमीच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाचा उल्लेख करताना म्हटले होते की, जन्मभूमीतून प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते. जन्मभूमीचे सपाटीकरण सुरू असताना सापडलेल्या मंदिराच्या अवशेषानंतर त्यांचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध झाले. मार्च २०२० मध्ये सपाटीकरणात सापडलेले अवशेष महंमद यांनी ८ व्या शतकातील असल्याचे म्हटले होेते.

२० ऑगस्ट रोजी दिल्लीत बांधकाम समितीची बैठक
श्रीराम जन्मभूमी मंदिराचे विधिवत बांधकाम सुरू करण्यापूर्वी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक बांधकाम समितीच्या सदस्यांसमवेत २० ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बांधकाम समितीशी संबंधित सदस्यही असतील. बांधकाम समितीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्र आहेत. न्यास व संबधित बांधकाम समितीच्या या बैठकीत मंदिर बांधकामाची रूपरेषा ठरेल. विश्वस्तांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पाया खोदण्यापासून बांधकाम सुरू करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर चर्चा होणार आहे. बांधकाम पूर्ण करण्याचे वेळापत्रकही तयार होईल. मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी नकाशा मंजूर व्हायचा आहे.

बातम्या आणखी आहेत...