आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गुजरात:कबर खोदणारे चौघे एप्रिलपासून घरी गेले नाहीत, कब्रस्तानातच झोपतात, किती कबरी खोदल्या आठवत नाही

सुरत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरतमध्ये कोरोनामुळे 1300 लोकांचा मृत्यू, 800 वर्षे जुन्या स्मशानाचा करतात वापर

कोरोना साथरोगात गुजरातच्या सुरतमध्ये आजपर्यंत १३०० हून अधिक लोकांवर अंत्यसंस्कार व दफनविधी होतो आहे. स्मशानाबरोबरच दफनविधीही वाढत आहेत. मोरा भागल कब्रस्तानात खोदकाम करणाऱ्या इब्राहिमने सांगितले, पूर्वी आम्हाला दिवसभर बसून राहावे लागत होते. मृतदेह येत नव्हते. ही कोविड-१९ पूर्वीची बाब होती. आता कोरोनामुळे श्वास घेण्यासही वेळ नाही. एक कबर खोदण्यास चार ते पाच तास लागतात. एकाच वेळी ४-५ अथवा जास्तही मृतदेह येतात. यामुळे कबर खोदणे अवघड झाले आहे. यामुळे जेसीबीने कबर खोदली जात आहे. पूर्वी ६ फूट कबर खोदावी लागत होती. आता दहा फूट खोल कबर खोदावी लागते.

बोटावाल ट्रस्टचे कब्रस्तान ८०० वर्षे जुने आहे. गेल्या ८०० वर्षांत या जागेचा वापर करण्यात आलेला नाही. आता कोरोनाचे मृतदेह दफन करण्यासाठी त्या जागेचा वापर केला जात आहे.

कब्रस्तान आमचे घर, येथेच येते जेवण; पत्नी व मुलांशी फोनवरच होते बोलणे
इब्राहिम म्हणाले, आम्हाला कोरोनाचा काही धोका नाही. परंतु एकता ट्रस्टची टीम येते. त्यांच्याकडे कर्मचारी नसल्याने आम्हालाच पीपीई कीट घालून दफनविधीस मदत करतो. आम्ही चाैघे आहोत. परंतु एकालाही एप्रिल महिन्यापासून घरी जाण्याची परवानगी मिळालेली नाही. घरातील सदस्यांशी दुरूनच संवाद होतो. मुले व पत्नींशी मोबाइलवर बोलणे होते. आता तर कबरस्तान आमचे घर आहे. येथेच रात्री झोपी जातो. आमचे एक वेगळेच जग झाले आहे. आता वाटते येथे जो राहतो, तोच खरा सुरक्षित आहे. कारण येथे कोणी येत नाही.