आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजात प्रचंड गदराेळ पाहायला मिळाला. कामकाजात कधी-कधी घडणाऱ्या घटना चिंता निर्माण करणाऱ्या ठरतात, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.हैदराबादेतील पब्लिक स्कूलच्या सुवर्णमहाेत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमात नायडूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आधी मला तुम्हाला एक गाेष्ट आवर्जून सांगायची आहे. ती म्हणजे निसर्गावर भरभरून प्रेम करा. त्याच्यासाेबत राहा. हा माझा सल्ला समजा. दुसरा एक सल्ला द्यायचा आहे. शिस्त बाळगा.
सभ्यता साेडू नका. मला हेच खासदारांनाही सांगावे लागते. कारण संसदेतील कामकाजाबद्दलची तुम्हाला कल्पना असावी, असे मला वाटते. संसदेचे कामकाज तर सुरू आहे. परंतु कधी-कधी ते कशा प्रकारे चालते, हे तुम्ही पाहिले आहे. त्याची जास्त चिंता वाटते.
विराेधकांनी सातत्याने गदाराेळ केल्याने राज्यसभा, लाेकसभेचे कामकाज अनेक वेळा स्थगित झाले. खरे तर पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच कामकाजात व्यत्यय येत हाेता. आपल्या भाषणात नायडू पुढे म्हणाले, नवीन शिक्षण धाेरण याेग्य दिशेने सरकारने उचललेले पाऊल आहे. हे धाेरण सर्वांनी लागू केले पाहिजे. हे धाेरण अतिशय व्यावहारिक आहे. वास्तविक परदेशी राज्यकर्त्यांनी देशावर सत्ता गाजवली. साेबतच देशाचे नुकसानही केले. हे दुर्दैवी आहे. ही गोष्ट नव्या पिढीने लक्षात घेतली पाहिजे.
एकेकाळी शिक्षणात गुणवत्ता : एकेकाळी भारतात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला यासारखी शिक्षणाची केंद्रे हाेती. देशात उच्च गुणवत्तेच्या अनेक संस्था कार्यरत हाेत्या. त्या काळी जगभरातील लाेक भारतात या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत हाेते. भारत जगातील सर्वात श्रीमंत देश तसेच विश्वगुरू म्हणून परिचित हाेता. आता पुन्हा आपल्याला आपल्या मुळाशी गेले पाहिजे. ती गुणवत्ता सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे, असे नायडू यांनी सांगितले.
इंग्लिश माध्यमात शिकलाे नाही..
देशाच्या विद्यमान राष्ट्रपती, मी आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी आम्ही इंग्लिश माध्यमाच्या शाळांत शिकलेलाे नाही. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनीदेखील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेले नाही. व्यक्तीला एकापेक्षा जास्त भाषा शिकता येऊ शकतात. त्यात इंग्लिशही आहे. परंतु मातृभाषेला विसरता कामा नये. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबराेबरच शिस्त, तंदुरुस्ती, उच्च ध्येय आणि परिश्रम केल्यास त्यांना आपली स्वप्ने सत्यात उतरवता येऊ शकतात, असे नायडूंनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.