आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The G 20 Meeting Will Be Held In Jammu And Kashmir, With The Heads Of 20 Countries

जी-20 ची बैठक:जम्मू-काश्मिरात होणार, 20 देशांचे प्रमुख येणार; पाकिस्तानचा दुष्प्रचार जगासमोर उघड करण्यासाठी निर्णय

जम्मू2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानचा दुष्प्रचार जगासमोर उघड करण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी जी-20 चे अध्यक्षपद भूषवणार असल्याने भारताने या गटाची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर प्रशासनाने आयोजनाच्या व्यवस्थापनासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

भारताकडे १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी-20 चे अध्यक्षपद असेल. ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर आणि राज्याच्या पुनर्गठनानंतर काश्मीरमध्ये अशी पहिली मोठी आंतरराष्ट्रीय परिषद होईल. सामान्य प्रशासन विभागाने परराष्ट्र मंत्रालयाच्या ४ जूनच्या पत्राचा हवाला देऊन निवास आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. काश्मिरी लोक भारतीय मुख्य प्रवाहाचा भाग आहेत आणि भारतीय राज्यघटनेवर त्यांचा विश्वास आहे, हे या परिषदेद्वारे भारत जगाला दाखवून देईल.

जी-20 मधील देश

जी-20 मध्ये भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपीय संघटना यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...