आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गहलोत यांनी पुन्हा एकदा भाजपवर राज्यातील सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर जनता म्हणते की आता महाराष्ट्राची पाळी येत असे असेही गहलोत म्हणाले.
सिरोही येथील काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळ गहलोत यांनी कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल कॉन्स्फरन्सद्वारे संबोधित केले. गहलोत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही मोठा आरोप करत म्हटले की, शाह याआधीही बंडखोर आमदारांशी भेटले होते. तेव्हा ते आमदारांना म्हणाले की, हा माझ्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. मी 5 सरकार पाडले आणि आता सहावे देखील पाडणार आहे.
कोरोना काळातही सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले - गहलोत
मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की, कोरोना काळातही राजस्थानचे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. आमच्या आमदार अमित शाहांना भेटण्यासाठी गेले असता तेव्हा त्या बैठकीत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यसभा खासदार सैय्यद जाफर इस्लाम देखील होते. जवळपास एक तास ही बैठक झाली. यानंतर आमदारांनी मला सांगितले की, कुठे सरदार पटेल यांच्यासारखे गृहमंत्री होते आणि तिथे अमित शहासारखे लोक त्यांच्या खुर्चीवर बसले आहेत याची आम्हाला लाज वाटली. मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यावेळी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांसमवेत चर्चा करण्याचे नाटकही करत होते आणि त्या आमदारांना प्रोत्साहनही देत होते, असेही आमदारांनी सांगितले होते.
आपल्याकडे 4 राज्यांचे सरकार पाडण्याचा अनुभव आहे आणि पाचवे देखील पाडणारच आहोत असे वातावरण तेथे तयार झाले होते. गहलोत म्हणाले की, त्यावेळी अजय माकन, रणदीप सुरजेवाला, वेणुगोपाल आणि अविनाश पांडे येथे येऊन बसले. त्यावेळी त्यांनी जे निर्णय घेतले, आमच्या नेत्यांना बर्खास्त केले तेव्हा आमचे सरकार वाचले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.