आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंडच्या चमाेलीत हिमस्खलनामुळे आलेल्या आपत्तीनंतरचे चित्र अतिशय भयंकर हाेते. सोमवारी बचाव कार्यात विविध ठिकाणी अडकलेले मृतदेह आढळून येत होते. खरे तर ही दुर्घटनाच भयंकर होती. त्यात ऋषिगंगा नदीच्या किनारी १५ हेक्टरचे मरिंडा जंगल काही मिनिटांत साफ झाले. ऋषिगंगा व तपाेवन वीज प्रकल्पाशिवाय चीन सीमेपर्यंत पाेहाेचलेला बीआरआे पूल, तीन ते चार पूल, अनेक मंदिरे आणि घरे केवळ अर्ध्या तासांत उद्ध्वस्त झाले. चमाेलीच्या रेनी गावात हे संकट काेसळले. हा भाग नीती खाेऱ्यात येताे. चीन सीमेजवळ हा भाग येताे. डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ हिमालयन जिओलाॅजीच्या संशाेधकांनी आपत्तीबाबत काही शंका व्यक्त केल्या. त्या धक्कादायक आहेत. ही गाेष्ट केवळ पुरापुरती मर्यादित नाही. त्यामागे हिमस्खलनाने आपत्तीच्या राैद्र रूपाला आणखी विक्राळ बनवले. वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. एस.के. राय म्हणाले, ज्या भागात आपत्ती आली, तेथे काही दिवसांपूर्वी प्रचंड हिमवृष्टी झाली हाेती. शिखर भागात बर्फ माेठ्या प्रमाणात साठला हाेता. त्यातून तापमानात घट झाल्याने हिमनदी जास्त गाेठली. साेबतच बर्फातील ठिसूळपणाही वाढतच राहिला. बहुधा पृष्ठभागावरील बर्फ व ढिगाऱ्यासाेबत लाेट खालच्या दिशेने घसरले. आमची एक टीम त्याचा सखाेल अभ्यास करत आहे. त्याचे निष्कर्ष लवकरच जाहीर केले जातील. ताज्या अभ्यासानुसार हवामानातील बदलामुळे गंगाेत्री हिमनदी दरवर्षी २२ मीटर मागे घसरत चालली आहे. उत्तराखंडमधील हिमनद्या शिखराकडे जास्त उंचीवर असल्याने धाेकादायक ठरतात, असे मानले जाते.
हिमस्खलनानंतर सतत डेटा मॅपिंग, विश्लेषणाचे काम
केंद्राचे संचालक प्राे. एमपीएस बिष्ट म्हणाले, ऋषिगंगा कॅचमेंट भागात २०१३ मध्ये केदारनाथ येथे आलेला प्रलय बिलकुल वेगळा आहे. दुर्घटनेमागे हिमस्खलन किंवा बर्फाच्या लाेटांची घसरण हे कारण नाही. उत्तराखंड अंतराळसंबंधी केंद्राने गेल्या दिवसांतील मॅपिंगचा आढावा घेतला. त्यात असे काेणतेही संकेत िमळालेले नाहीत. आता हिमनदीचे हिमस्खलन, नदीचा प्रवाह गाेठणे यामागे बर्फाचे शिखर काेसळणे यास आपत्तीच्या सुरुवातीचे कारण मानले जात आहे. केंद्र दुर्घटनेपासून सातत्याने डेटा मॅपिंग करत आहे. या भागात भूस्खलनाची अनेक केंद्रे आहेत.
भास्कर नाॅलेज : देवभूमीतील नदींची रचना, व्यवस्थाही वेगळी
हिमालयाच्या माेठ्या क्षेत्राचा भाग देवभूमी उत्तराखंडमध्ये आहे. हिमनद्यांची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. त्यातच २०१३ ची केदारनाथ व आता बद्रीनाथजवळील चमाेलीच्या आपत्तीचे रहस्य लपलेले आहे. पर्वतांवरील हिमनद्या व त्यातून उगम हाेणाऱ्या नद्यांचे प्रवाह तसे अतिशय शांत आहेत. स्थान बदलल्यानंतर नाव बदलले जाते आणि मार्ग राेखल्यानंतर राैद्ररूप धारण केले जाते, असे नद्याचे स्वरूप म्हणता येईल. देवभूमीच्या या नद्यांतून पर्वतात पाच प्रयाग तयार हाेतात. कुमायूंच्या दाेन प्रमुख भागांत उत्तराखंडच्या गढवाल भागात माेठी हिमनदी आहे.
दुर्घटनेच्या वेळी प्रकल्पाच्या गेटपर्यंत आलेला भाऊ नंतर झाला बेपत्ता..
दुर्घटनेनंतर बेपत्ता लाेकांचे नातेवाईक घटनास्थळी येऊ लागले आहेत. अश्रूंनी डबडबलेले डाेळे एखादा चमत्कार हाेईल, याची प्रतीक्षा करताना भटकू लागले आहेत. हरिद्वारहून आलेले संदीप एका दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जाऊन विकी नावाच्या भावाबद्दल चाैकशी करू लागले आहेत. परंतु कुणाकडेही काहीच उत्तर नाही. अधिकारी ढिगाऱ्याकडे पाहत प्रतीक्षा करण्याचा सल्ला देत आहेत. हरिद्वारच्या एका इलेक्ट्रिक कंपनीकडून ऋषिगंगा वीज प्रकल्पात कार्यरत हाेता. त्याच्यासाेबत इतर तीन कामगारही हाेते. संदीप म्हणाले, दुर्घटनेत प्राण वाचलेल्या मित्राने भावाबद्दलची माहिती दिली. दुर्घटना घडली तेव्हा विकी प्रकल्पाच्या गेटपर्यंत पाेहाेचला हाेता. परंतु नंतर त्याचा काही शाेध लागला नाही. हरेंद्र कंडियाल यांची कहाणीदेखील अशीच आहे. ते नंदप्रयाग घाटावरील रहिवासी आहेत. त्यांच्यासाेबत आलेले भक्तप्रसाद यांचे चुलत भाऊ देखील बेपत्ता आहेत. हे दाेघेही प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात हाेते. दुर्घटनेनंतर स्थानिक लाेकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कडाक्याच्या थंडीतही आता लाेकांना घरात जाण्याची इच्छा हाेत नाही. घटनेनंतर घरात मातीच माती वाहून आली आहे. भिंतींनाही तडे गेले आहेत, असे एका महिलेने सांगितले. घटनेवेळी बसलेल्या हादऱ्यांमुळे लाेकांची अजूनही झाेप उडाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.