आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Girl Child Born With Both Legs Inverted From The Knee, The Parents Left Her In The Hospital, Admitted To SNCU

आई माझा दोष काय?:​​​​​​​मध्यप्रदेशात जन्माला आली उलट्या पायांची मुलगी; बाळाला रुग्णालयात सोडून आई-वडिलांनी काढला पळ, 36 तासांनंतर परत आले

हरदा (पवन तिवारी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑपरेशननंतर पाय सरळ केले जाऊ शकतात

मध्य प्रदेशच्या हरदा जिल्हा रुग्णालयात एक असामान्य मुलीचा जन्म झाला आहे. तिचे दोन्हीही पाय हे उलटे आहेत, म्हणजे, पंजे मागच्या दिशेने आहेत. डॉक्टर याला एक दुर्मिळ घटना मानत आहेत. तिला स्पेशल न्यू बॉर्न चाईल्ड केअर युनिट (SNCU) मध्ये दाखल केले गेले आहे. दुसरीकडे, जन्मानंतर तिचे आई-वडील तिला सोडून निघून गेले होते. परंतु 36 तासांनंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.

सोमवारी दुपारी 12 वाजता खिरकिया ब्लॉकच्या झांझारी येथे राहणाऱ्या विक्रमच्या पत्नी पप्पी यांची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. नॉर्मल डिलीवरी झाली. जन्माच्या वेळेपासूनच मुलीचे पाय उलटे होते. बालरोग तज्ञ डॉ. सनी जुनेजाने सांगितले की 5 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत असे प्रकरण आले नाही.

इंदौर- भोपाळच्या बालरोग तज्ञ आणि ऑर्थोपेडिक तज्ञांशी देखील चर्चा केली. ते म्हणतात की ही बाब दुर्मिळ आहे. मुलीचे वजन 1 किलो 600 ग्रॅम आहे. सामान्यत: मुलांचे वजन 2 किलो 700 ग्रॅम ते 3 किलो 200 ग्रॅम पर्यंत असते.

पालक निघून गेले, घोषणा होतच राहिली
बाळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. ती धोक्याच्या बाहेर आहे. मुलीचा जन्म होताच तिचे आई-वडील निघून गेले होते. मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत रुग्णालयाच्या आवारात त्यांचा शोध घेण्यात आला. माईक वरुन घोषणादेखील करण्यात आली होती, परंतु त्यांचा शोध लागला नाही. दुसरीकडे मीडियामध्ये बातमी आणि या प्रकरणात पोलिसांची मदत घेण्यात येईल असे वृत्त येताच मुलीची आजी मुनिया बाई, आई पप्पी आणि वडील विक्रम हे रुग्णालयात पोहोचले. ते म्हणाले की, आम्ही येथून कुठे गेलोच नव्हतो.

ऑपरेशनने पाय सरळ होऊ शकतात
इंदूरच्या ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. पुष्पवर्धन मंडलेचा म्हणतात की हा आजार अनुवांशिक असू शकतो किंवा मुलीच्या आईच्या गर्भात जागा कमी असल्यामुळे होऊ शकतो. अशी प्रकरणे लाखांमध्ये एक आहेत. ऑपरेशननंतर पाय सरळ केले जाऊ शकतात. बाळाला पाहिल्यानंतरच काही बोलता येईल. आजपर्यंत असा प्रकार मी कधी पाहिला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...