आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Girl Was Selling Mangoes On The Roadside For Online Studies, Mumbai Businessman Bought 12 Mangoes For 1 Lakh 20

आंब्याने बदलले आयुष्य:मुलीला एक डझन आंब्यांचे मिळाले सव्वा लाख रुपये

जमशेदपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमध्ये जमशेदपूरची तुलसी (११) हिला ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोन हवा होता. पैसे नसल्याने तिला फोन विकत घेता येत नव्हता. म्हणून ती रोज सकाळी बागेतील आंबे रस्त्यावर विकायची. मुंबईतील व्यावसायिक तुलसीजवळ आंबे विकत घ्यायला थांबले आणि त्यांना समजले की ती मोबाइल नसल्याने अभ्यास करू शकत नाही आणि रोज सकाळी रस्त्यावर आंबे विकायला बसते. ते व्यावसायिक मुंबईतील व्हॅल्युएबल एडुटेमनेर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमेया हेते होते.

त्यांनी तुलसीला मोबाइल देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तुलसीकडून एक डझन आंबे घेतले आणि प्रत्येक आंब्याचे दहा हजार रुपये याप्रमाणे एक डझन आंब्यांना १.२० लाख रुपये दिले. तसेच त्यांनी पूर्ण वर्षभरासाठी मुलीच्या मोबाइलचे रिचार्जही करून दिले. या पैशातून तुलसीने १३ हजारांचा मोबाइल घेतला. उर्वरित पैसे तिच्या शिक्षणासाठी ठेवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...