आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमधील दुर्घटना:घरी परतणाऱ्या किती मजुरांचा मृत्यू झाला याचा सरकारकडे ‘डेटा’ नाही; संसदेत केंद्र सरकार म्हणाले, याबाबत कसलीही माहिती नाही

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनजीओ सेव्ह लाइफ फाउंडेशननुसार, 24 मार्च ते 2 जूनदरम्यान अपघातांत 198 मजुरांचा मृत्यू झाला

मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागल्याने लाखो मजुरांना घरी परतावे लागले होते. त्यात शेकडोंचा विविध अपघातांत मृत्यू झाला होता. तेव्हा मजुरांच्या या वेदनेवरून केंद्र व राज्य सरकारांत भलेही काही दिवसांपर्यंत राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले असतील, पण आता लॉकडाऊनदरम्यान घरी परतताना किती मजुरांचा मृत्यू झाला हे माहीत नाही, असे केंद्र सरकारने संसदेत म्हटले आहे.

आपल्याकडे स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूचा कुठलाही आकडा नाही, असे कोरोना काळात संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच सरकारने मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर किती मजुरांचा रोजगार हिरावला यावरही सरकारने कुठलेही सर्वेक्षण केले नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खासदारांनी २३० अतारांकित प्रश्न विचारले. त्यापैकी ३१ प्रश्न कामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संबंधित होते. त्यापैकी १५ प्रश्न कोरोना काळात रोजगार हिरावणे, स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीदरम्यान झालेले मृत्यू आणि बेरोजगारी दराशी संबंधित होते.

प्रश्न : मजुरांच्या मृत्यूंची राज्यनिहाय संख्या किती? उत्तर : अशी आकडेवारी ठेवली जात नाही

लॉकडाऊनमुळे मूळ गावी परतताना मजुरांच्या मृत्यूंची राज्यनिहाय संख्या किती आहे? अशी विचारणा प्रश्न क्रमांक ६० मध्ये करण्यात आली होती. त्यावर सरकारने म्हटले की, अशी आकडेवारी ठेवली जात नाही. अनेक प्रश्नांवर सरकारने थेट माहिती तर दिलीच नाही, उलट भलतेच उत्तर देण्यात आले. कोविड - १९ महामारीदरम्यान रोजगाराच्या किती संधी हिरावल्या गेल्या असे प्रश्न क्रमांक १०१ मध्ये विचारण्यात आले होते. त्यावर सरकारने उत्तर दिले,“कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आणि धोक्यांचा सामना करण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे आणि सरकार अनेक पावले उचलत आहे.”