आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकच्या DGP चा राजीनामा:तपासात सरकार दबाव आणत असल्याचा केला आरोप; आरोपामुळे राजकारणात उडाली एकच खळबळ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे DGP रवींद्रनाथ यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामागे त्यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. त्याचा छळ होत असल्याचे रवींद्रनाथ यांचे म्हणणे आहे. यावरून कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रवींद्रनाथ म्हणाले की, कर्नाटक सरकार बनावट SC/ST प्रमाणपत्रे वापरणाऱ्या लोकांविरुद्धची चौकशी थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहे.

मंगळवारी सकाळी मुख्य सचिव पी रवी कुमार यांची भेट घेतल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचे रवींद्रनाथ यांनी सांगीतले. याबदलची माहिती त्यांनी एका दिवसापूर्वीच म्हणजे सोमवारी दिली होती. 1989 च्या बॅचचे IPS असलेले हे रवींद्रनाथ हे राजीनामा देणारे आणि परत घेणारे अधिकारी म्हणून सर्वत्र ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी 2008, 2014 आणि 2020 मध्येही राजीनामा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...