आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तरुणाईसह लहान मुलांत प्रचंड लोकप्रिय असलेले गेमिंग अॅप ‘प्लेअर अननोन बॅटल ग्राउंड’ म्हणजेच पब्जीवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. पूर्व लडाखमध्ये एलएसीवर चीनविरुद्ध तणाव सुरू असताना सरकारने बुधवारी पब्जीसह चीनशी संबंधित ११८ मोबाइल अॅप्सवर बंदीची घोषणा केली.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले की, हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व व अखंडत्व, देश-राज्याची सुरक्षितता व सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. मंत्रालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. अनेक अहवालांनुसार, अँड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध अनेक अॅप्स युजर्सचा डेटा चाेरी करून भारताबाहेर पाठवत होते. जूनमध्ये भारताने टिकटॉकसह ४७ अॅपवर बंदी आणली होती. जुलैत ५९ चिनी अॅप्स प्रतिबंधित केले. आतापर्यंत एकूण २२४ अॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे.
जगभरात पब्जीचे १७.५ कोटी डाऊनलोड्स, ५ कोटी भारतात, एकूण उत्पन्न २२ हजार कोटी पार
जगभरात तब्बल १७.५ कोटी लोकांनी पब्जी डाऊनलोड केेले आहे. यात सर्वाधिक ५ कोटी युजर्स भारतात आहेत. पैकी ३.५ कोटी सक्रिय आहेत. पब्जीने यंदाच्या सहा महिन्यांत सुमारे ९,७०० कोटींची कमाई केली. कंपनीचे आजवरचे उत्पन्न २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. द. कोरियन व्हिडिओ गेम कंपनी ब्ल्यूहोलने हा गेम डेव्हलप केला आहे. त्यात चिनी कंपनी टॅन्सेंटचीही हिस्सेदारी आहे.
मुलांना पब्जी खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे त्रस्त होते पालक
मुलांना पब्जी खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे त्यांचे पालक त्रस्त होते. काही राज्यांत तर त्यावर तात्पुरती बंदीही लादली होती. त्यावर पब्जीने सुरक्षित इकोसिस्टिमचे आश्वासन दिले होते. जानेवारी २०१९ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान एका महिलेने मुलांच्या गेमिंग वेडाबाबत प्रश्न केला होता. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ये पब्जी वाला है क्या?’ असे विचारले होते.
या कंपन्यांतही चिनी गुंतवणूक
> बिग बास्केट
> ड्रीम-११
> डेल्हीवरी
> हाइक
> फ्लिपकार्ट
> मेकमायट्रिप
> ओला
> ओयो
> पेटीएम मॉल
> पेटीएम
> पॉलिसी बाजार
> क्विकर
फिक्कीच्या अहवालानुसार, भारताच्या ऊर्जा क्षेत्रात चीनची ७%, निर्मितीत ५%, सेवा क्षेत्रात ४% गुंतवणूक आहे. भारत आपल्या एकूण निर्यातीपैकी ८% निर्यात चीनला करतो.
प्रतिबंधित अॅप्समध्ये बायडू, ल्युडो सुपरस्टार आणि अॅपलॉकचाही समावेश
अॅपुस लॉँचर प्रो,अॅपुस लॉँचर -थीम, अॅपुस, सिक्युरिटी अँटिव्हायरस,अॅपुस टर्बो क्लीनर २०२०,अॅपुस फ्लॅशलाइट,कट-कट-फोटो एडिटर, बायडू, बायडू एक्स्प्रेस एडिशन, फेस यू, शेअर सेव्ह बाय शाओमी, कॅमकार्ड- कार्डरीडर,कॅमकार्ड बिझनेस, कॅमकार्ड सेल्स ऑफिस, कॅमओसीआर, इननोट, वूव मीटिंग, सुपर क्लीन, व्हीचॅट रीडिंग, गव्हर्नमेंट व्हीचॅट, स्माॅल क्यू ब्रश, टॅन्सेंट व्हीयून, पीटू, व्हीचॅट, वर्क, सायबर हंटर, सायबर हंटर लाइट, नाइव्हज आऊट नो रूल्स, सुपर मेचा चॅम्पियन, लाइफ आफ्टर, डाऊन ऑफ आइसलेस, लुडो वर्ल्ड सुपरस्टार, चेस रश, पब्जी मोबाइल नॉर्डिक मॅप, पब्जी मोबाइल लाइट, राइझ ऑफ किंगडम, आर्ट ऑफ कॉन्क्वेस्ट, डार्क टँक्स, वाॅरपथ, गेम ऑफ सुलतान्स, गॅलरी व्हॉल्ट, स्मार्ट अॅपलॉक, मेसेज लॉक, हाइड अॅप, अॅपलॉक, अॅपलॉक लाइट, ड्युअस स्पेस, जॅककॅक प्रो, जॅककॅक लाइव्ह, म्युझिक-एपी ३ ,म्युझिक प्लेअर, एचडी कॅमेरा सेल्फी, क्लीनर-फोन बूस्टर, वेब ब्राऊझर अँड फास्ट एक्सप्लोरर, व्हिडिओ प्लेअर ऑल फॉर्मेट, फोटो गॅलरी एचडी, फोटो गॅलरी अँड अॅल्बम, म्युझिक प्लेअर-बास बूस्टर, एचडी कॅमेरा, एचडी कॅमेरा प्रो, म्युझिक प्लेअर-एमपी 3 प्लेअर, गॅलरी एचडी, वेब ब्राऊझर, वेब ब्राऊझर- सिक्युअर एक्सप्लोरर, म्युझिक प्लेअर-ऑडिअो प्लेअर, व्हिडिओ प्लेअर - ऑल फॉर्मेट, लॅमॉर लव्ह ऑल ओव्हर द वर्ल्ड, अॅमोर, एमव्ही मास्टर-मेक युअर स्टेटस, एमव्ही मास्टर-बेस्ट व्हिडिओ, अॅपुस मेसेज सेंटर, लिव्ह यू मीट न्यू पीपल, कॅरम फ्रेंड्स, लूडो ऑल स्टार, बाइक रेसिंग, रेंजर्स ऑफ ओव्हिलियन, झेड कॅमेरा, गो एसएमएस प्रो, यू डिक्शनरी, यू लाइक, टेंटन, मायको चॅट, किटी लाइव्ह, मलय सोशल डेटिंग अॅप, अलीपे, अलीपे एचके, मोबाइल ताओबाओ, योकू, रोड ऑफ किंग्ज, सिना न्यूज, नेतीज न्यूज, पेंग्युइन एफएम, मर्डर्स परसूट्स, टॅन्सेंट वाॅचलिस्ट, लर्न चायनिज एल सुपर चायनिज, हुया लाइव्ह, लिटिल क्यू अल्बम, फायटिंग लँडलॉर्ड््स, हाय मीटू, मोबाइल लिजेंड्स, व्हीपीएन फॉर टिकटॉक, व्हीपीएन फॉर टिकटॉक, पेंग्विन ई-स्पोर्ट््स, बायकार्स ऑफर्स एव्हरीवन, आयपिक, ब्यूटी कॅमेरा प्लस, पॅरलल स्पेस लाइट, चीफ अल्माइटी, मार्व्हल सुपर वाॅर, एएफके अरेना, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, क्रुसेडर्स ऑफ लाइट, माफिया सिटी, ऑनमायोजी नेटइझ गेम्स, राइड आऊट हीरोज, यिमेंग, जियांगू, लिजेंड: रायझिंग एम्पायर नेटइझ गेम्स, अरेना ऑफ व्हॅलोर, सोल हंटर्स, रूल्स ऑफ सर्व्हाइव्हल.
यापूर्वी 106 अॅप्सवर बंदी
यापूर्वी केंद्र सरकारने 106 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिक टॉक, यूसी ब्राउजर, हेलो आणि शेअर इटसारख्या 59 अॅप्सला बॅन केले होते. सरकारने म्हटले की, या चायनीज अॅप्सचे वर्कर भारताबाहेरील आहेत, याद्वारे यूजर्सचा डेटा चोरला जात आहे. या अॅप्समुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे या अॅप्सवर बंदी घालण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.