आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अॅम्नेस्टी प्रोग्राम:सरकार आणू शकते अवैध साेने वैध करण्याची योजना, भारतीय कुटुंबांकडे सुमारे २५ हजार टन सोने

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या योजनेअंतर्गत संबंधितांना दंड भरून आपले अवैध सोने वैध करता येईल

अवैध सोने बाळगणाऱ्यांसाठी सरकारच्या वतीने आता माफी योजना (अॅम्नेस्टी प्रोग्राम) आणली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत संबंधितांना दंड भरून आपले अवैध सोने वैध करता येईल आणि शिक्षा टाळता येईल.

अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेच्या मदतीने सरकारला करचोरी रोखण्यासोबतच सोन्याच्या आयातीत कपात करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या प्रस्तावांतर्गत या योजनेनुसार, अवैध सोने असणाऱ्यांना ही माहिती कर अधिकाऱ्याला देऊन दंड भरता येईल व सोने वैध करता येईल. सध्या हा प्रस्ताव प्राथमिक अवस्थेत असून संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे.

प्रस्तावानुसार अवैध सोन्याची माहिती देणाऱ्यांना आपले काही सोने सरकारकडे काही वर्षांसाठी ठेवावे लागेल. गेल्या वर्षीही अशीच योजना आणली जाणार होती, मात्र ती रखडली. तज्ञांनुसार, ही योजना जोखमीची ठरेल. भारतीय कुटुंबांकडे सुमारे २५ हजार टन सोने आहे. हा कोणत्याही देशातील सोन्याचा सर्वात मोठा खासगी साठा आहे.