आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या हीरक जयंतीच्या शेवटच्या ७५ आठवड्यांची उलटगणती फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात मोदी सरकारने कार्यक्रमांची मोठी यादीच तयार केली आहे.
अमृत महोत्सवी समारंभांसाठीच्या नोडल मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमांमध्ये ‘न्यू इंडिया’च्या धोरणातील चार स्तंभांतर्गत ४१ प्रमुख क्षेत्रातील उद्दिष्टांच्या थीमवर आधारित कार्यक्रम प्रत्येक आठवड्यात होतील. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना दरडोई जीडीपी २०१८ च्या १९०० डॉलरवरून ३ हजार डॉलर करण्याला यात प्राधान्य असेल. यासाठी नीती आयोगाने संबंधित पक्ष, मंत्रालये, विभागांकडून सूचना मागवल्या होत्या आणि त्याआधारे एक स्ट्रॅटेजी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले. त्याच मानकांनुसार प्रत्येक मंत्रालयास त्यांच्या कार्याची थीम तयार करण्यास सांगितले आहे.
महोत्सवासाठी टास्क फोर्सच्या बैठकीत ७५ आठवड्यांच्या उत्सवाचा आढावा घेण्यात आला. कमीत कमी ७५ कोटी नागरिकांची उपस्थिती, सहभाग किंवा व्हर्च्युअल उपस्थिती नक्की करण्याचे लक्ष्य टास्क फोर्सने ठेवले आहे. तयारीसाठी पंचायत पातळीपर्यंत सुमारे ८०० विभागांना जबाबदारी दिली जाईल आणि ५५० पेक्षा जास्त व्यावसायिक व तज्ञांची मदत घेतली जाईल. महोत्सवाच्या ७५ आठवड्यांची तीन गटांत विभागणी असेल. प्रत्येक २५ आठवड्यांतील कार्यक्रमांचा टास्क फोर्स आढावा घेईल. समारोप लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाने होईल. यात स्वतंत्र भारताला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या प्रवासासाठी २०४७ च्या महा-महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली जाईल.
१०० प्रमुख क्षेत्रे, ज्यात रोजगार, तंत्रज्ञान, शेतीच्या थीमवर असतील कार्यक्रम
विकासाला वेग देणारी ११ प्रमुख क्षेत्रे जसे- विकासदर, रोजगार, तंत्रज्ञान, उद्योग, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, आधुनिक शेती, व्हॅल्यू चेन बनवण्याची प्रगती, गृह, पर्यटन व खनिज क्षेत्रे प्रगतीच्या थीमवर आधारित कार्यक्रम असतील. तसेच पायाभूत सुविधांची १० क्षेत्रे, सर्वसमावेशकतेची १२ क्षेत्रे, सुशासनाच्या ७ प्रमुख क्षेत्रांच्या थीमवर कार्यक्रम होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.