आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेला माहिती दिली की, कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अहवालानुसार कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.
मांडवीय असेही म्हणाले की, कोरोनाशी संबंधित आकडेवारीत छेडछाड करण्यासाठी आम्ही कोणत्याही राज्यावर दबाव आणला नाही. केंद्र सरकारचे काम फक्त राज्यांकडून डेटा गोळा करणे आणि प्रकाशित करणे हे आहे. आम्ही कोणत्याही राज्यास कधीही डेटामध्ये छेडछाड करण्यास सांगितले नाही. असे करण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनीही असेच म्हटले होते.
मांडवीय कॉंग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. वेणुगोपाल यांनी सभागृहात सरकारला प्रश्न विचारला की रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन नसल्यामुळे असे घडले आहे.
आरोग्य मंत्री मांडवीय यांनी राज्यसभेत लस आणि ऑक्सिजनविषयीही माहिती दिली. मांडवीय यांनी सांगितल्या या गोष्टी...
केंद्र सरकारने राज्यांना पूर्ण मदत पोहोचवली
आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, आरोग्य व्यवस्था राज्यांचा विषय आहे. यानंतरही केंद्र सरकारने त्यांची खूप मदत केली आहे. सर्व राज्यांपर्यंत ऑक्सजिन सप्लाय पोहोचवण्यात आले आहे. डॉ. भारती म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये दररोज 3095 मीट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडत होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये दररोज 9000 मीट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडली. केंद्राने राज्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी चांगले फ्रेमवर्क तयार केले होते.
आरोग्य मंत्री तिसऱ्या लाटेवर काय म्हणाले?
तिसऱ्या लाटेबाबत बोलताना आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी राज्यसभेत सांगितले की, 130 कोटी लोकांसह सर्व राज्य सरकारांनीही अशी प्रतिज्ञा घ्यावी की आम्ही देशात तिसरी लाट येऊ देणार नाही. आमचा संकल्प आणि पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन आपल्याला तिसर्या लाटेपासून वाचवू शकते.
एकत्र काम करण्याची ही वेळ आहे. आपण काम केले की नाही हे केंद्र सरकारने कोणत्याही राज्याला सांगितले नाही. आम्हाला या विषयावर राजकारण करायचे नाही. मांडविया म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूटकडून आम्हाला दरमहा कोविशील्डचे 11-12 कोटी डोस मिळत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.