आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीईआरटी पुस्तकांतून गांधीजी, संघ व हिंदू कट्टरतेचे मुद्दे हटवले:हे इतिहास विकृत करणारे सरकार : काँग्रेस

दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“गांधीजींच्या हिंदू-मुस्लिम ऐक्याने हिंदू अतिरेक्यांना चिथावणी दिली. त्यांच्या मृत्यूनंतर आरएसएससारख्या संघटनांवर बंदी घालण्यात आली. आता हा भाग एनसीईआरटीच्या इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून काढण्यात आला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, हे इतिहास विकृत करणारे सरकार असल्याचे म्हटले. तुम्ही पाठ्यपुस्तके संपादित करू शकता, पण इतिहास मिटवू शकत नाही.

दुसरीकडे एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश सकलानी म्हणाले की, विषय तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी हा उतारा काढून टाकण्याची शिफारस केली होती. गेल्या वर्षी एनसीईआरटीने ओव्हरलॅपिंग आणि असंबद्धेची कारणे देत गुजरात दंगल, मुघल राजवट, शीतयुद्ध, नक्षलवादी चळवळीवरील धड्यांसह अनेक भाग वगळण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा गांधीजी, संघ आणि हिंदू कट्टरवादाबद्दल हटवलेल्या भागाचा उल्लेख नव्हता.