आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Government Thought That Farmers Would Not Fight Because Of Corona, Rahul Gandhi's Attack On The Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यात्रेचा तिसरा दिवस:कोरोनामुळे शेतकरी लढणार नाही असे सरकारला वाटायचे, राहुल गांधी यांचा सरकारवर प्रहार

पतियाळा/ सिरसा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन कृषी कायदे लागू झाल्यास शेतकरी अंबानी व अदानींचे गुलाम होतील

नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये तिसऱ्या दिवशीही काँग्रेसची यात्रा सुरू होती. पतियाळात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारने कोरोना काळात कृषी कायदे आणले. शेतकरी कोरोनाच्या भीतीने रस्त्यावर उतरणार नाही, असे सरकारला वाटायचे. मात्र शेतकरी आपल्या जिवाची बाजी लावून न्यायासाठी लढू शकतो हे सरकारला माहीत नाही. बाजार पद्धतीत त्रुटी आहेत. समित्या वाढवणे गरजेचे असताना मोदी सरकार ही यंत्रणाच नष्ट करत आहे. बाजार समित्या बंद झाल्यावर शेतकरी काय करेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, आज जवान सीमेवर उभा आहे. मात्र मोदी ८००० कोटींची विमाने खरेदी करत आहेत. दरम्यान, पतियाळानंतर हरियाणाला जातानाही राहुल यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवले. हरियाणा-पंजाब सीमेवर पोलिसांनी राहुल यांची ट्रॅक्टर रॅली रोखली. राहुल यांनी तेथेच धरणे दिले. ते म्हणाले, मी पुढे जाणार नाही. येथेच एक तास, पाच तास, २४ तास, १०० तास किंवा ५००० तास वाट पाहण्यात मला आनंद आहे. काही वेळेच्या चर्चेनंतर राहुल यांना १०० कार्यकर्त्यांसह हरियाणात जाण्याची परवानगी मिळाली. सिरसात राहुल रॅलीला संबोधित करत म्हणाले, नवीन कृषी कायदे लागू झाल्यास शेतकरी अंबानी व अदानींचे गुलाम होतील. एक किंवा दोन वर्षात शेतकऱ्याची जमीन हिसकावून घेतली जाईल.

बातम्या आणखी आहेत...