आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना महामारीला मात देण्यासाठी भारतात जानेवारीपासून लसीकरण कार्यक्रम हाती घेतला जाऊ शकताे. केंद्रीय आराेग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. काही आठवड्यांत काही लसींना आपत्कालीन वापराची परवानगी मिळू शकते.
दाेन कंपन्यांनी परवानगीसाठी आधीच अर्ज केला आहे. इतर सहा लसींचे परीक्षण पुढच्या टप्प्यात आहे. भारतात आतापर्यंत १ काेटी लाेक काेराेनाबाधित झाले. १.४४ लाखांहून जास्त लाेकांना प्राण गमवावे लागले. दुसरीकडे आॅगस्टपर्यंत ३० काेटी लाेकांचे लसीकरण पूर्ण हाेईल. लसीकरण कार्यक्रमावर केंद्र सरकार १० हजार काेटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. बिहार व केरळ सरकार लाेकांना माेफत लस उपलब्ध करून देणार आहे. लवकरच इतर राज्येही अशा प्रकारची घाेषणा करू शकतात.
तयारी काय आहे?
देशात २.२३ लाख परिचारिका व दाई आहेत. १.५४ लाख जणांना लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी केले जाईल. नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही असतील. लसीच्या साठवणुकीसाठी २९ हजार काेल्ड स्टाेअरेज फॅसिलिटी आहेत. हरियाणा, कर्नाटक, पश्चिम बंगालच्या कृषी संशाेधन केंद्राकडे सुविधा आहे.
मोहिमेत ६० काेटी डाेस
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी भारताला ६० काेटी डाेस हवे आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार मार्चपर्यंत ५० काेटी डाेस तयार केले जातील. आॅक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीने काेविशील्ड तयार करत असलेल्या सीरमने याआधीच आपत्कालीन वापरासाठी अर्ज दाखल केला आहे.
पहिल्या टप्प्यात काेण ?
लसीवर राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समूहाच्या (एनईजीव्हीएसी) सल्ल्यानुसार पहिल्या टप्प्यात ३० काेटी लाेकांचे लसीकरण केले जाईल. त्यापैकी १ काेटी आराेग्य कर्मचारी असतील. साेबतच २ काेटी फ्रंटलाइन व इतर कामगारांना लस दिली जाईल. त्याव्यतिरिक्त ५० वर्षांहून जास्त वयाच्या २७ काेटी लाेक असतील.
भारतात या सहा लसीही परीक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यात
- झायकाेव्ह-डी - अहमदाबादची कंपनी झायडस-कॅडिला विकसित करतेय.
- हैदराबादची बायाेलाॅजिक ई-एमआयटीसाेबत मिळून लस तयार करतेय.
- पुण्याची जेनोव्हा एचजीसीआे-१९ करतेय भारताची पहिली एम-आरएनए
- भारत बायाेटेक नोझल व्हॅक्सिन डेव्हलप करतेय.
- रशियन लस स्पुटनिकचे-५ ला डाॅ. रेड्डी लॅबमध्ये परीक्षण.
- नाेव्हावॅक्ससाेबत सीरम आणखी एक लस बनवतेय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.