आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचा माफीनामा:म्हणाले- दुसऱ्याचे कौतुक करताना माझी चूक झाली, या नम्र सेवकाला माफ करा

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. या विनम्र राज्य सेवकाला राज्यातील जनता माफ करेल, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

29 जुलै रोजी एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, मी कधी कधी इथल्या लोकांना सांगतो की, जर तुम्ही गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून काढले तर तुमच्याकडे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. मुंबईला आर्थिक राजधानीही म्हटले जाणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी सोशल मीडियावर माफी मागितली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी सोशल मीडियावर माफी मागितली आहे.

माझ्याकडून चूक झाली- कोश्यारी

माफी मागून राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात लिहिले की, मला महाराष्ट्रातील जनतेचे 3 वर्षांपासून अपार प्रेम मिळाले आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा आदर वाढवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, पण एखाद्या कार्यक्रमात माझ्याकडून चुकून काही चूक झाली असेल, तर ती महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा अपमान म्हणून घेण्याची कल्पनाही करता येणार नाही. महाराष्ट्राच्या थोर संतांच्या परंपरेतील तुमच्या या नम्र सेवकाला क्षमा करा.

नेमके काय म्हणाले होते राज्यपाल?

राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, "कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

महाराष्ट्रातून टीकेचा भडीमार

या विधानाद्वारे त्यांनी एकप्रकारे मराठी माणसांनाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठीमन पेटून उठले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी विरोधी पक्ष विशेषतः सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटानेही त्यांच्या या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र व मुंबईच्या विकासात मराठी माणसांचे सर्वाधिक योगदान असल्याचे हे पक्ष म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करत त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले. यामुळे या वादावर पडदा पडला.

पण राज्यपाल कोश्यारींनी यावेळी प्रथमच असे वादग्रस्त विधान केले नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशी विधाने करुन स्वतःचे अंग पोळवून घेतले आहे. चला तर मग पाहुया कोश्यारींनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त विधाने व त्यांचे निर्णय...

छत्रपती शिवाजी महाराज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गत 27 फेब्रुवारी रोजी औरंगाबादेतील एका कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले -'चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्ताला छोटे लेखणार नाही. पण गुरुच स्थान समाजात नेहमीच मोठे असते. शिवाजी समर्थांना म्हणाले की, हे राज्य मला तुमच्या कृपेनेच मिळाले. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून शिवाजी महाराजांनी समर्थांना या राज्याची सत्तेची चावी देण्याची तयारी दर्शवली. त्यावर समर्थांनी ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी अर्थात विश्वस्त आहात.'

त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. अनेक राजकीय संघटनांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर कोश्यारींनी आपली बाजू स्पष्ट करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. मला त्यांच्याबद्दल जेवढी माहिती होती, त्यावरून मला समर्थ रामदास त्यांचे गुरू असल्याचे वाटले. त्यामुळे मी हा संदर्भ दिला. पण याविषयी काही जणांनी मला काही वस्तुस्थिती सांगितली. त्याची विस्तृत माहिती मी घेणार आहे,' असे ते म्हणाले.

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले

कोश्यारींनी 2 मार्च रोजी देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले -'कल्पना करा की सावित्रीबाईंचे लग्न दहाव्या वर्षी झाले. त्यावेळी ज्योतिबा फुले 13 वर्षांचे होते. या वयात मुले-मुली काय करत असतील, लग्न झाल्यानंतर काय करत असतील याचा विचार करा.' त्यांच्या या विधानाचेही तीव्र पडसाद उमटले.

आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत...

बातम्या आणखी आहेत...