आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Governor Now Went To Villages And Heard The Public Grievances, The Center Changed The British Tradition

कर्तव्यपथ:राज्यपाल आता गावोगावी जाऊन ऐकणार जनतक्रारी, केंद्राने इंग्रजांची परंपरा बदलली

सुजित ठाकूर | नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी गेल्या १५ महिन्यांत राज्यातील ४० विधानसभा मतदारसंघांचे दौरे केले. - Divya Marathi
गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी गेल्या १५ महिन्यांत राज्यातील ४० विधानसभा मतदारसंघांचे दौरे केले.

इंग्रज काळातील परंपरा आणि मानसिकता बदलण्याच्या दिशेने केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. यापुढे राज्यपालांनाही ग्रामीण भागाचे दौरे करावे लागणार आहेत . राजभवनातून बाहेर पडून नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणे ऐकावे लागणार आहे. त्यासाठी काही नियम बनवला जाणार नाहीत, परंतु त्याची सुरुवात गोवा येथून झाली आहे. गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी गेल्या १५ महिन्यांत राज्यातील ४० विधानसभा मतदारसंघांचे दौरे केले.

या दौऱ्यांमध्ये १०० ग्रामपंचायतींना त्यांनी भेटी दिल्या. खासदार,आमदार, सरपंच नागरिकांशी संवाद साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश कालीन ‘साहेबी थाटाची’ परंपरा सोडून राज्यपालांनाही लोकांशी संवाद साधला पाहिजे अशी इच्छा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार राज्यपालांना आता दरवर्षी १०० गावांचा दौरा करुन स्थानिकांशी संवाद साधावा लागणार अाहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे सरकारने एखाद्या योजनेची फाईल राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवल्यास त्यातील बारकावे माहिती करुन घेऊन त्यात सुधारणा सुचवू शकतील. मेघालय,गोवा आणि जम्मू-काश्मिरचे राज्यपालपद भूषवलेले सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळात राजभवनाचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी कायम खुले ठेवले जात होते. इतर राज्यपालांनाही त्याचा कित्ता गिरवला परंतु नागरिकांशी संवाद साधण्याचा नवा पायंडा गोव्यापासून पडला आहे.

सध्या फक्त राजभवनात भेटी अन् शपथ देतात सध्या राज्यपाल लोकांना केवळ राजभवनात भेटतात. त्यांचे मुख्य काम सरकार आणि राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना शपथ देणे हेच आहे. राजकीय उलथापालथीवेळी राजभवन सक्रिय होते. आता ही परंपरा बदलून सन २०२४ पर्यंतच्या राज्यपालांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम आखला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...