आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Groom Became Corona Infected And The Groom And Bride Took Seven Rounds Wearing PPE Kit, A Unique Wedding In The Presence Of The Administration Team; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PPE किट परिधान करत लावले लग्न​​​​​​​:नवरा मुलगा होता पॉझिटिव्ह; लग्न थांबवण्यासाठी आलेले अधिकारी वडीलधारी व्यक्तीसमोर नतमस्तक; नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलवर दिला आशीर्वाद

रतलाम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 एप्रिलला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. 26 ला होते लग्न

कोरोना लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर पीपीई किट परिधान करत सप्तपदी घेत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रतलाम येथील असून यामध्ये वधू आणि वर दोघांनीही पीपीई किट परिधान केलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये नवरा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने स्थानिक प्रशासनाचा यावर आक्षेप होता.

त्यामुळे त्यांना घटनेची माहिती मिळताच लग्न थांबवण्यासाठी लग्नाच्या ठिकाणी पोहचले. परंतु, कुटुंबातील वडीलधारी माणसांनी अधिकार्‍यांकडे लग्न न थांबवण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांनी कोरोनाची खबरदारी म्हणून पीपीई किट परिधान करुन लग्न लावण्याचा निर्णय घेतला. या लग्नात कुटुंबातील 4-4 लोकांचा समावेश होता. विशेष म्हणजे नातेवाईकांनी वधू व वराला व्हिडिओ कॉलवर आशीर्वाद दिला.

19 एप्रिलला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. 26 ला होते लग्न
रतलाम येथील परशुराम विहारमधील रहिवासी अभियंता आकाश वर्मा यांचे महेश नगर निवासी संजना वर्मा याच्याशी 26 एप्रिल रोजी लग्न होणार होते. दरम्यान, 19 एप्रिलला आकाश वर्माचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतरही दोन्ही कुटुंबांनी लग्न पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरातील मांगलिक भवनात लग्नाच्या विधी पूर्ण करण्यासाठी तयारी सुरु केली. दरम्यान, तेथील काही लोकांनी यासंबंधिची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. अशा परिस्थितीत तहसीलदार नवीन गर्ग लग्न थांबवण्यासाठी वरच्या घरी परशुराम विहार येथे पोहचले.

बातम्या आणखी आहेत...