आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे देहावसान:आज दिली जाणार भू-समाधी, 9 व्या वर्षी घर सोडले होते

भोपाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्वारका पीठ आणि ज्योर्तिमठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती (९९) यांचे रविवारी मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर येथील झाेतेश्वर आश्रमात दुपारी ३.३० वाजता निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांनी नुकताच ९९ वा वाढदिवस साजरा केला होता.

त्यांच्या पार्थिवाला सोमवारी परमहंसी गंगा आश्रमात भू-समाधी दिली जाईल. हा विधी झोतेश्वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान करतील. त्यांच्या पार्थिव शरीराला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले. यांनी ट्वीट केले स्वरूपानंद यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात झाला होता. नवव्या वर्षी स्वामी काशीला पोहोचले व तेथे ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग, शास्त्राचे शिक्षण घेतले. १९४२ मध्ये ते स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...