आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंदुरुस्त तरुणांचा अचानक हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय चिंतेत आहे. कोरोनानंतर या घटनांतील वाढीमुळे संशयाची सुई कोविड किंवा त्यापासून बचावात्मक आैषधी व लसीवर जात आहे. लॉकडाऊनपासून खानपान, राहणीमानात बदल झाल्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचाही अंदाज आहे. म्हणूनच हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमागील कारणांचे व्यापक अध्ययन होणार आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयएसीएमआर) या संस्थेला मेयोकार्डियल इन्फ्राक्शन म्हणजेच हृदयविकाराच्या वाढत्या घटनांच्या अभ्यासाची सूचना केली. आयसीएमआरने नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या मदतीने एक मॉडेल स्वीकारले. दोन पद्धतीने अध्ययनासाठी तज्ज्ञांच्या दोन टीम बनवल्या आहेत.
या दोन पद्धतींनी अध्ययन
1. रेट्रेट्रोस्पेक्टिव्ह केस कंट्रोलची एक पद्धत आहे. अचानक मृत्यूमागील कारणांचा शास्त्रीय वेध घेतला जाईल. त्यात कोविड संसर्ग, त्याच्या उपचाराच्या पद्धती, पुढे बाहेर पडल्यावर रुग्णाच्या शारीरिक- मानसिक स्थितींवर लक्ष केंद्रित करणार.
2. ही प्रॉस्पेक्टिव्ह अर्थात भविष्योन्मुख पद्धती असून यात व्हर्च्युअल ऑटोप्सी होईल. एम्समध्ये ही पद्धती २ वर्षांपूर्वी सुरू झाली. मृतदेहाच्या चिरफाडीऐवजी सीटी स्कॅनमध्ये ठेवून काही सेकंदांत सुमारे २५ हजार इमेज घेतल्या जातील.
तज्ज्ञांची टीम : फॉरेन्सिक मेडिसिन, रेडिआेलॉजी, न्यूरॉलॉजी, कार्डियोलॉजी, पॅथॉलॉजीचे तज्ज्ञ यात आहेत.
निगराणीही : या अध्ययनाच्या निगराणीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापना होईल.त्यात एपिडेमियोलॉजिस्ट्रस, क्लिनिशयन्स, पॅथॉलॉजिस्ट्रस,फॉरेन्सिक मेडिसिन तज्ज्ञ व सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञांचा समावेश केला आहे.
एकूण मृत्यूंमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण २८ टक्के
सरकारने अलीकडेच राज्यसभेत आयएसीएमआरच्या एका अहवालाचा हवाला दिला. २०१६ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी २८.१ टक्के मृत्यू हृदयविकाराचा झटका व इतर आजारांमुळे झाला. १९९० मध्ये हे प्रमाण १५.२ टक्के होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यूच्या कारणांमध्ये प्रामुख्याने तंबाखू, मद्यपान, वाढते जंकफूड व कमी झालेले शारीरिक श्रम यांचा समावेश आहे.
देशात एनपीसीडीएस कार्यक्रमांतर्गत १९४ स्पेशल कार्डियाक केअर युनिट स्थापन. ७०८ जिल्हास्तरीय एनसीडी क्लिनिक, सीएचसीवर ५६७१ एनसीडी क्लिनिकही स्थापन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.