आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश:हातगाडीवर मुलीला बसवून, गरोदर पत्नीला ८०० किमीपर्यंत ओढले

लांजी (बालाघाट)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादहून घरी परतलेल्या एका मजूर कुटुंबाची कहाणी

मध्य प्रदेशातील बालाघाट येथे कुंडे मोहगावाच्या रामू घोरमारे व पत्नी धनवंताबाई हैदराबादमध्ये मजुरी करत. लॉकडाऊनमुळे ठेकेदाराने काम बंद केले. त्यानंतर या मजूर कुटुंबाचा भाकरीसाठी संघर्ष सुरू झाला. मूळ गावी परतण्यासाठी सरकारी साधन न मिळाल्याने रामूने गरोदर पत्नी दोन वर्षांची मुलगी अनुरागिनीसोबत पायी चालून ८०० किमींचा प्रवास सुरू केला. काही वेळ मुलीला कुशीत घेतले. परंतु पत्नी व मुलगी थकल्यानंतर रामूने बांबू व लाकडाच्या मदतीने हातगाडी तयार केली. त्यावर पत्नी व मुलीला बसवले. मग हातगाडीच्या साह्याने ते बालाघाटच्या दिशेने चालू लागले. १७ दिवसानंतर ते लांजी सीमेवर पोहोचले. त्यानंतर प्रशासनाने त्यांना गाडीने मूळ घरी रवाना केले.

बातम्या आणखी आहेत...