आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल वॉर्मिंग:50 वर्षांत येणारी हीट वेव्ह प्रत्येक दशकात येतेय, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

जिनिव्हा/नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीस गेल्या ३० वर्षांतील भीषण उष्णतेचा सामना करत आहे. आगीमुळे हजारो एकर जंगल खाक झाले आहे. - Divya Marathi
ग्रीस गेल्या ३० वर्षांतील भीषण उष्णतेचा सामना करत आहे. आगीमुळे हजारो एकर जंगल खाक झाले आहे.

अनेक देश गेल्या चार महिन्यांपासून तीव्र उन्हाळा, दुष्काळ, आग, बर्फाळ वादळ, हिमवृष्टी आणि पुराचा सामना करत आहेत. त्याच्या तावडीत आल्याने शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी हवामान बदलास जबाबदार धरले आहे. संयुक्त राष्ट्राने सोमवारी हवामान बदलासंदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. यात म्हटले आहे की, जग हवामान बदलाच्या धोकादायक प्रभावाच्या खूपच जवळ आहे. येत्या २० वर्षांत जागतिक पातळीवर पृथ्वीचे तापमान १.५ अंशापर्यंत वाढेल. हे तापमान २०५० पर्यंत वाढेल असा अंदाज आधी शास्त्रज्ञांचा होता. मात्र, जगात वेगाने होणारी बांधकामे आणि वृक्षतोडीमुळे हे १० वर्षे आधीच म्हणजे २०४० पर्यंत वाढेल. संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या या अहवालाला हवामान बदलाबाबत सर्वात मोठा अहवाल म्हटले जात आहे.

कसा व किती घातक होत आहे हवामान बदल... भारतावर त्याचा किती परिणाम
उष्णता वाढेल, थंडी घटेल
: डोंगराळ भागात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. तर थंडीत मोठी घट झाली आहे. हे आगामी दशकातही सुरूच राहील. उत्तराखंडात ७ फेब्रुवारीला एक हिमनग तुटल्याने ऋषिगंगा आणि धौलीगंगा खोऱ्यात अचानक पूर आला होता. त्याच्या तावडीत आल्याने सुमारे २०० जणांचे जीव गेले.

डोंगरांवर बर्फाची कमरता : आशियात उंच डोंगरांवर हिमवर्षाव कमी झाला आहे. हिमनग पातळ झाले आहेत. २१ व्या शतकात बर्फाळ भाग व बर्फाच्या प्रमाणात घट सुरू राहील. हिमनगाचे वस्तुमान आणखी घटण्याची शक्यता आहे. यूएनने इशारा दिला आहे की, वाढते जागतिक तापमान आणि पावसामुळे हिमनग फुटण्याच्या घटना वाढतील.

हिंद महासागरात वाढेल तापमान : हिंदुकुश हिमालयात हिमनग मागे हटणे, समुद्राच्या पातळीत वाढ व पुराच्या दिशेने नेणाऱ्या चक्रीवादळांचा मिश्रित प्रभाव, एक अनिश्चित मान्सून, हवामान बदलामुळे भारतावर होणाऱ्या परिणामांची शक्यता आहे. आयपीसीसीने अहवालात म्हटले आहे की, यातील बहुतांशी प्रभाव न बदलता येणारे आहेत.

पॅरिस गोल्स : जवळपास सर्व देशांनी २०१५ च्या पॅरिस हवामान करारावर स्वाक्षरी केली आहे. जागतिक तापमान वाढ २ अंश सेल्सियसच्या खाली ठेवणे त्याचा हेतू आहे. आयपीसीसीच्या अहवालाच्या २०० पेक्षा जास्त लेखकांनी पाच अंगांनी पाहिले आणि निष्कर्ष काढला की, २०४० च्या दशकापर्यंत जगाला १.५ अंश सीमा ओलांडताना पाहता येईल.

भारतात काही हवामान प्रभाव अपरिवर्तनीय
हवामान संकटाने जागतिक पातळीवर अनेक प्रभाव निर्माण केले आहेत, जे अपरिवर्तनीय आहेत. ते प्रभावित करत राहतील. डोंगर व ध्रुवीय हिमनग वितळत राहतील. याचाच अर्थ भारत व शेजारी देशांत हिमालय बदलता न येणाऱ्या परिवर्तनांचा सामना करू शकतो.

आयपीसीसी अहवालातील प्रमुख मुद्दे
- हवामान बदल जलचक्र तीव्र करत आहे. त्यामुळे जास्त तीव्र पाऊस आणि पूर येतो. तसेच अनेक भागात तीव्र दुष्काळ आणतो.
- त्यातून पावसाचा पॅटर्न प्रभावित होत आहे. उच्च अक्षांशांमध्ये पावसात वाढ होण्याची शक्यता आहे, तर मोठ्या भागात तो घटण्याचा अंदाज आहे.
- किनाऱ्यांवर समुद्राच्या पातळीत सतत वाढ पाहायला मिळेल. त्यातून सखल भागात सतत जास्त व गंभीर पूर व किनाऱ्यावरील भूभाग नष्ट होईल.
- समुद्रपातळीच्या मोठ्या घटना ज्या आधी शंभर वर्षांत एकदा व्हायच्या, या शतकाच्या अखेरपर्यंत दरवर्षी होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...