आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:हायकोर्टाने हिंसाचारावर राज्य सरकारकडे अहवाल मागवला

काेलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनंतर सुरू झालेल्या हिंसाचाराचे सत्र थांबले नाही. सोमवारी रात्री हुगळी जिल्ह्याच्या रिशरामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाला. यानंतर हावडा-वर्धमान रेल्वे मार्गावर तीन तासांपर्यंत वाहतूक ठप्प राहिली. भाजप नेते सुभेंदू अधिकारी यांच्या वकिलांनी कलकत्ता उच्च न्यायालयात ताज्या हिंसाचाराचा उल्लेख केला. यावर न्यायालयाने राज्य सरकारकडे हिंसाचारावर अहवाल मागितला अाहे. रिशरामध्ये कलम १४४ लागू असून इंटरनेट बंद आहे. उच्च न्यायालयाने अधिकारी यांच्या याचिकेवर सोमवारी हावडा हिंसाचारावर अहवाल मागवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे राम नवमी दिवशी झालेल्या हिंसाचाराचा अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.