आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Highest Carbon Emissions From Western Countries, PM Modi Alleges On World Environment Day, Latest News And Update

विकसित राष्ट्रांकडून पर्यावरणाचे नुकसान:जागतिक पर्यावरण दिनी PM मोदी म्हणाले -पाश्चिमात्य देशांकडून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अथक प्रयत्न करत आहे. हवामान बदलात देशाची भूमिका नगण्य आहे. याऊलट जगातील मोठे देश केवळ नैसर्गिक संसाधनाची नासाडीच करत नाहीत, तर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनही याच देशांत होते, अशी तिखट टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जागतिक पर्यावरण दिनी विकसित राष्ट्रांवर निशाणा साधताना केली.

ते म्हणाले -स्वच्छ भारत मोहीम असो किंवा वेस्ट टू वेल्थशी संबंधित कार्यक्रम असो, अमृत मिशन मोहिमेतील शहरांत आधूनिक सीव्हेज ट्रीटमेंट प्लांट्सची निर्मिती असो किंवा सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी करण्याचा मुद्दा असो भारताने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी बहुआयामी प्रयत्न केले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले- आम्ही कॅच द रेन सारख्या मोहिमेद्वारे देशातील लोकांना जलसंधारणाशी जोडत आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले- आम्ही कॅच द रेन सारख्या मोहिमेद्वारे देशातील लोकांना जलसंधारणाशी जोडत आहोत.

भारतीय योजनांत पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य

देशात गत 8 वर्षांत राबवण्यात आलेल्या सर्वच मोहिमांत पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. हवामान बदलाच्या समस्येत भारताची भूमिका अत्यंत नगण्य आहे. पण, जगातील आधूनिक देश केवळ पृथ्वीच्या संसाधनाचा सर्वाधिक उपसा करत असून, सर्वाधिक कार्बन उत्सर्जनही त्यांच्याच खात्यात जाते. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सीडीआरआय व इंटरनॅश्नल सोलार अलायंसच्या निर्मितीचे नेतृत्व केले आहे भारातने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट ठेवल्याचेही ते यावेळी म्हणाले.

देशाने माती जीवंत ठेवली

मोदी म्हणाले -देशाने माती जिवंत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. यासाठी आम्ही 5 प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रीत केले.

  1. मातीला रसायनमुक्त ठेवावी.
  2. मातीत राहणारे जीव ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो ते कसे वाचवायचे.
  3. जमिनीतील ओलावा कसा टिकवायचा, पाण्याची उपलब्धता कशी वाढवायची.
  4. भूगर्भातील कमी पाण्यामुळे जमिनीचे होणारे नुकसान कसे दूर करायचे.
  5. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जमिनीची सतत होणारी धूप कशी थांबवायची.
पीएम मोदी म्हणाले- युरियाच्या 100% निम कोटिंगचा जमिनीला मोठा लाभ झाला आहे.
पीएम मोदी म्हणाले- युरियाच्या 100% निम कोटिंगचा जमिनीला मोठा लाभ झाला आहे.

22 कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्डचे वितरण

पीएम मोदी म्हणाले- पूर्वी आपल्या देशातील शेतकऱ्यांना माती कोणत्या प्रकारची आहे, त्याच्या जमिनीत कोणती कमतरता आहे, किती आहे याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. सरकारने या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्याची मोहीम राबविली. त्याअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना २२ कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्ड देण्यात आलेत. यासोबतच देशात माती परीक्षणाशी संबंधित एक मोठे नेटवर्कही तयार करण्यात आले. या माहितीच्या आधारावर शेतकरी खत आणि सूक्ष्म पोषणाचा वापर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...