आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:देशात एक दिवसात सर्वाधिक 3285, महाराष्ट्रात 895 जणांचा मृत्यू, दोन लाखांवर मृत्यू झालेला भारत चौथा देश

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रथमच 1 दिवसात 2.62 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, मंगळवारी ३,६२,७५७ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा १.७९ कोटींवर गेला. चिंतेची बाब म्हणजे बरे होण्याचा दर घसरून ८२.३% झाला आहे, हा दर याच वर्षी १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ मार्चला झाला होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आकडे रोज नवा विक्रम घडवत आहेत. १० सर्वाधिक प्रभावित राज्यांतच एप्रिलमध्ये मृतांची संख्या ५ पट वाढली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ८९५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६,१७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एका दिवसात ३८१ आणि यूपीत २६४ जणांचा मृत्यू झाला. अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर आता भारत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला चौथा देश आहे.

बातम्या आणखी आहेत...