आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात 2020 साली झालेल्या एकूण मृत्यूंविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अहवाल जारी केला आहे. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) 2020 नामक या अहवालानुसार, 2020 मध्ये देशात तब्बल 81.16 लाख जणांचा मृत्यू झाला. यातील 45 टक्के लोकांना कोणतेही औषधोपचार मिळाले नाही. उपचाराअभावी मृत्यू झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 2019 मध्ये उपचाराअभावी 34.5% मृत्यू झाले होते.
2020 च्या प्रारंभी देशातील बहुतांश रुग्णालयांतील 80 ते 100 टक्के बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव होते. यामुळे नॉन-कोविड रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यमुळे 2020 मध्ये रुग्णालयांत होणाऱ्या मृत्यूंचा आकडा घसरल्याचे दिसून येत आहे. या मृत्यूंचा आकडा 32.1% वरुन 28% पर्यंत घसरला आहे. ही यासंबंधीची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.
2011 मध्ये उपचाराअभावी 10% जणांचा बळी
वैद्यकीय सुविधांअभावी व रुग्णालयांत होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांतील हे अंतर नवे नाही. गत 10 वर्षांत वैद्यकीय सुविधांअभावी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. तर वैद्यकीय संस्थांत होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वेगाने घटले आहे.
2011 साली वैद्यकीय सुविधेअभावी केवळ 10 टक्के मृत्यू झाले होते. तथापि, त्यावेळी केवळ 67 टक्के मृत्यू नोंदवण्यात येत होते. त्याकाळी संस्थांत होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले. कारण, हे मृत्यूची अधिकृत नोंदणी केली जात होती. त्यानंतर मृत्यूंची नोंदणी वाढत गेली तशी मृत्यूंचा आकडाही वाढत गेला.
2 वर्षांत हे अंतर 'न'च्या बरोबर
2017 व 2018 मध्ये वैद्यकीय सुविधांअभावी व वैद्यकीय सुविधांत होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांत फारशी तफावत नव्हती. ही आकडेवारी देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या तुलनेत एक तृतीयांश एवढी होती. उर्वरित एक तृतीयांश मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
2019 साली वैद्यकीय सुविधांअभावी होणारे मृत्यू, वैद्यकीय संस्थांत होणाऱ्या मृत्यूंहून अधिक होते. पण, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये उपचारांअभावी होणाऱ्या मृत्यूंत वाढ झाली. ट्रेंडनुसार, 2021 मध्ये हा आकडा आणखी वाढेल. कारण, महामारीमुळे देशातील एका मोठ्या लोकसंख्येला रुग्णालयांत उपचारांची सुविधा मिळाली नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.