आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Historic Indo US Beka Agreement; "China Is A Threat To Democracy, The United States Is With India," US Foreign Affairs Minister Said

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या क्षेपणास्त्राला लक्ष्यापर्यंत नेणार अमेरिका:भारत-अमेरिका यांच्यात ऐतिहासिक बेका करार; अमेरिकी परराष्ट्रमंत्री म्हणाले - चीन लोकशाहीसाठी धोकादायक, अमेरिका भारतासोबत आहे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2+2 चर्चेत लष्करी तंत्रज्ञान, नकाशे आणि सॅटेलाइट डेटा शेअर करण्याच्या रणनीतीबाबत करार

भारत - अमेरिकेत ऐतिहासिक बेका (बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन अॅग्रीमेंट) करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मंगळवारी दोन्ही देशांत 2+2 चर्चा झाली. तीत दोन्ही देशांचे संरक्षण आणि परराष्ट्रमंत्री भेटले. करारामुळे दोन्ही देशांत उच्चस्तरीय लष्करी तंत्रज्ञान, रणनीतिक महत्त्व असलेले नकाशे आणि गोपनीय सॅटेलाइट डेटाची सहजपणे देवाणघेवाण होऊ शकेल. त्यामुळे भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान लक्ष्य अचूकपणे भेदता येईल. या करारामुळे भारताला अमेरिकी क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित तंत्रज्ञान मिळण्याचा मार्गही सोपा झाला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ म्हणाले, ‘ मी युद्ध स्मारकात सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी (भारत) प्राण देणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तीत गलवान खोऱ्यात चीनविरोधातील कारवाईत शहीद झालेले २० सैनिकही होते. अखंडत्वाचे रक्षण करण्यासाठी अमेरिका नेहमीच भारतासोबत उभा राहील. चीनचा कम्युनिस्ट पक्ष लोकशाही समर्थक नाही.’ 2+2 बैठकीनंतर पॉम्पिओंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही अमेरिकेच्या दोन्ही मंत्र्यांसोबत वेगवेगळी बैठक घेतली.

5 करारांवर स्वाक्षऱ्या

1. बेका(बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट) 2. पृथ्वी विज्ञान तंत्रज्ञान सहकार्यावर एमओयू. 3. आण्विक सहकार्यात वाढ करण्याचा करार. 4. टपाल सेवेशी संबंधित करार. 5. आयुर्वेद आणि कर्करोग संशोधनात सहकार्य.

चीनविरोधात एकत्र यावे लागेल : अॅस्पर

भारत-अमेरिकेची मैत्री फक्त आशियासाठी नव्हे, तर जगासाठीही महत्त्वाची आहे. चीनपासून जगाला असलेला धोका वाढत आहे. त्यामुळे मोठ्या देशांना एकत्र यावे लागेल. भारत, जपान, अमेरिका एकत्रितपणे अनेक लष्करी मोहिमी करतील. - मार्क अॅस्पर, संरक्षणमंत्री, अमेरिका

सर्व आव्हानांशी एकत्रित लढू : पॉम्पिओ

चीनने पसरवलेल्या विषाणूचा परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहे. पण भारत-अमेरिका फक्त चीनशीच नव्हे तर इतर सर्व आव्हानांशी एकत्रित लढतील. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देतो. - माइक पॉम्पिओ, परराष्ट्रमंत्री, अमेरिका