आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने संतापाच्या भरात कापले पत्नीचे नाक:महिला होळीसाठी सासरी येण्यास देत होती नकार, पतीने धारदार शस्त्राने केला हल्ला

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नातलगांसोबत तोंड लपवून बसलेली पीडित महिला. - Divya Marathi
नातलगांसोबत तोंड लपवून बसलेली पीडित महिला.

पत्नी-पत्नीमधील वाद नवे नाहीत. पण अनेकदा हे वाद एवढे टोकाला जातात की या दोघांपैकी एकजण काहीतरी टोकाचे पाऊल उचलतो आणि आयुष्याचे वाटोळे होते. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात घडली आहे. श्योपूरच्या बेनीपुरा गावातील एक महिला आपल्या पतीसोबत सासरी जाण्यास नकार देत होती. यामुळे संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने थेट तिचे नाकच कापून टाकले. या घटनेमुळे महिलेवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. रक्तस्त्रावामुळे तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

होळीसाठी घरी येण्यास देत होती नकार

यासंबंधीच्या माहितीनुसार, बेनीपुरा येथील सरोज आदिवासी नामक महिला शनिवारी सकाळी आपल्या माहेरच्या लोकांसोबत एका व्यक्तीच्या शेतात पीक काढणीचे काम करत होती. तिथे अचानक तिचा पती अमीर आदिवासी पोहोचला. सरोज महिला मागील महिन्याभरापासून आग्रा येथील आपल्या माहेरी राहत होती. तिचा नवरा अमीरही तिच्यासोबत सासुरवाडीत राहत होता. होळीचा सण जवळ आल्यामुळे तो पत्नीला आपल्यासोबत सासरी येण्याचा आग्रह करत होता. पण पत्नी नकार देत होता. यामुळे अमीरच्या रागाचा पारा एवढा चढला की त्याने थेट धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. त्यात सरोजचे नाकच कापले गेले. या हल्ल्यानंतर अमीर घटनास्थळावरून फरार झाला.

रुग्णालयात उपचार सुरू

या घटनेत सरोज रक्तबंबाळ झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने विजयपूर येथील रुग्णालयात दाखल केले. तिथे तिची प्रकृती गंभीर बनल्याचे डॉक्टरांनीस सांगितले. या प्रकरणी पतीविरोधात आग्रा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सासऱ्याने जावयाविरोधात तक्रार

या प्रकरणी पीडित महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ते म्हणाले - माझ्या जावयाने माझ्या मुलीचे नाक कापले. या घटनेनंतर तो बेनीपुरा या आपल्या गावी पळून गेला आहे. विजयपूरचे एसडीओपी निर्भय सिंह अलवा यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, पतीने पत्नीने नाक कापल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...