आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Idea Of A National Party Is Outdated And Regional Parties Should Be Formed To Defeat The BJP, Hence The Expression Of Democracy: Moitra; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:राष्ट्रीय पक्षाचा विचार आता जुना झाला असून भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधावी, त्यातूनच लोकशाहीची अभिव्यक्ती : मोइत्रा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृणमूल खासदार म्हणाल्या, दीदींना सत्तावादी म्हणणे चुकीचे, इतर पक्षांच्या तुलनेत आम्हाला स्वातंत्र्य

राष्ट्रीय पक्षाचा विचार आता संपुष्टात आला आहे. काळ बदलला आहे. राष्ट्रीय पक्षासोबत लढताना पूर्वी राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची गरज असायची. आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाच्या राजकारणाला नवा आकार दिला. पक्षाच्या अल्पसंख्याक धोरणाव्यतिरिक्त बंगालमधील निवडणुकीतील विजय इत्यादी मुद्द्यांवर मीडिया प्लॅटफॉर्म इन्क्वायरीशी विशेष चर्चा केली. त्याचे मुख्य अंश....

प्रादेशिक पक्षाच्या वाढत्या महत्त्वाबद्दल
बंगालच्या निवडणुकीत आम्ही काही गोष्टी दाखवून दिल्या. कोणाचाही लाट असली तरी प्रादेशिक पक्षांना विजयी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, हे दिसले. राष्ट्रीय पक्षाला दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाने टक्कर देण्याचे दिवस राहिलेले नाहीत. आता भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधली पाहिजे. आपापल्या राज्यात लढले पाहिजे. काँग्रेस पुन्हा उभी राहील, असे वाटत असल्यास ३५० जागांवर आणि तेही प्रत्येक राज्यात काँग्रेसचा विजय अशक्य आहे. परंतु बंगालमध्ये तृणमूल, तामिळनाडूत एआयएडीएमके व तीन-चार राज्यांत काँग्रेसच्या असलेल्या ताकदीवरून आता आपल्याला राष्ट्रीय पक्षाची गरज राहिली नसल्याचे स्पष्ट झाले. अर्थात राज्यांद्वारे आता लोकशाहीची अभिव्यक्ती होईल.

पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल
ही गोष्ट मला चुकीची वाटत नाही. भाजपमध्ये ३०-४० वर्षांपासून आहेत. त्यांचा मी सन्मान करते. वेगवेगळी विचारसरणी स्वाभाविक असते. परंतु एकाच विचारसरणीला समर्पित आहोत, असे सांगून अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली जाते ही गोष्ट मला दु:ख देणारी वाटते. जितन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे यांची उदाहरणे समोर आहेत. मुकुल रॉय यांना चूक लक्षात आल्याबराेबर ते परतले. आम्ही त्यांचे स्वागत केले. मी देखील १०-११ वर्षांपूर्वी काँग्रेस सोडली होती. कारण मला बंगालमध्ये तळागाळात जाऊन काम करण्याची इच्छा होती. परंतु काँग्रेसमध्ये मला ते शक्य होत नव्हते.

बंगालच्या विजयावर
बंगालमधील विजयामागे अनेक कारणे आहेत, असे मला वाटते. कोणत्याही लाटेची चिंता न करणारा नेता तृणमूलमध्ये आहे. राज्यातील जनतेच्या भावनांना समग्र व व्यापक अर्थाने समजून त्यांचे प्रभावी रूपाने संचलन करण्याचे काम तृणमूल व नेत्यांनी केले. आम्ही बंगालच्या माध्यमातून आयडिया ऑफ इंडिया सांगू शकलो. भलेही लोक तृणमूलचे समर्थक नसतील. कदाचित ममता बॅनर्जी पसंतही नसतील. परंतु आम्ही भाजपला बाहेरचा रस्ता दाखवण्यात यशस्वी राहिलो. हीच वेळेची मागणी आहे. आम्हाला पराभूत करण्यासाठी भाजपने पैसे, साधने, माध्यम, निवडणूक आयोग, केंद्रीय दल यांचा वापर केला होता. मात्र आम्ही जोरदार पुनरागमन केले. हा विजय त्या अर्थाने संपूर्ण म्हणता येईल.

दीदींची प्रतिमा सत्तावादी
ममता बॅनर्जी लोकांमधील कार्यकर्त्या आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पक्षात सर्वांना स्वातंत्र्य आहे. त्यांनी मला कधीही काय केले पाहिजे, असा सल्ला दिला नाही. संसदेत मी काय बोलावे, याबद्दल ममता मला सांगत असतील, असे तुम्हाला वाटते का? तसे झाले असते तर सौगत रॉय व कल्याण बॅनर्जी पक्षात राहिले असते. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. एवढे स्वातंत्र्य कोणत्याही पक्षात नाही.

तृणमूलचे अल्पसंख्याक धोरण
तृणमूल संविधानात दिलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर वाटचाल करत आहे. भाजपच्या विरोधात केवळ ममताच उभ्या राहू शकतात, असा विश्वास मुस्लिमांना का वाटला असता? दीदी त्यांच्यासाठी लढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...