आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Idea Of Buying Air India Came Up Easily After Diwali; Financier's Approval Raised Expectations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:दिवाळीनंतर चर्चेत सहज सुचली एअर इंडिया खरेदी करण्याची कल्पना; फायनान्सरच्या होकाराने अपेक्षा उंचावली, कर्मचारीही 1-1 लाख रु. देणार

नवी दिल्ली | शरद पांडेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या कॉर्पोरेट इतिहासातील पहिली घटना ठरणार, कर्मचारी आपली कंपनी खरेदी करणार

६९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जात अडकलेल्या एअर इंडिया या सरकारी कंपनीला तारणहार मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा एक समूहच आपली कंपनी खरेदी करण्यासाठी समोर आला आहे. हे कर्मचारी खासगी इक्विटी फर्मसोबत सरकारी लिलावात भाग घेण्याची तयारी करत आहेत. ही बाब प्रत्यक्षात उतरल्यास देशाच्या कॉर्पोरेट इतिहासातील ही पहिलीच घटना असेल, ज्यात एखादी सरकारी कंपनी कर्मचारी खरेदी करतील.

कंपनीचे तारणहार ठरणार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एकाने सांगितले,‘दिवाळीनंतर एअर इंडियाच्या मुख्यालयात चार-पाच सहकारी बसले होते. सर्व जण एअर इंडियात ३०-३२ वर्षांपासून नोकरी करत आहेत. यंदा दिवाळी साजरी करत आहोत, पण पुढच्या दिवाळीला एअर इंडियाची स्थिती काय असेल, कर्मचाऱ्यांचे काय होईल माहीत नाही, अशी चर्चा सुरू होती. जॉइनिंगच्या पहिल्या दिवसाचे अनुभव सांगताना सर्व जण भावुक होऊ लागले. तेव्हा एक अधिकारी म्हणाला, ज्या कंपनीत संपूर्ण आयुष्य घालवले ती खरेदी करता आली असती तर बरे झाले असते. त्यावर एक अधिकारी म्हणाला, एवढी मोठी रक्कम आपण कुठून आणणार? तेव्हा एखादा फायनान्सर शोधून कर्मचाऱ्यांनीच ती खरेदी करावी, अशी कल्पना सुचली. त्यावर सर्व जण गंभीर झाले.’

अधिकारी म्हणाला, ‘ आमच्या विचारांना जणू पंखच फुटले. आम्ही फायनान्सरचा शोध सुरू केला आणि एका नावावर सहमती झाली. खासगी इक्विटी फर्म आमच्या प्रस्तावावर तयार झाली. त्यानंतर ज्यांची नोकरी ३० ते ३२ वर्षांची झाली अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. जुन्या कर्मचाऱ्यांची कंपनीशी भावनात्मक जवळीक राहील, ते या मोहिमेला पूर्णपणे सहकार्य करतील, असा त्यामागे तर्क होता. या मोहिमेत २०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. प्रत्येक जण १-१ लाख रुपये जमा करत आहेत. एअर इंडियात एकूण १४ हजार कर्मचारी आहेत. कंपनीत आजही क्षमता आहे. सर्व काही ठीक झाले तर कंपनी ट्रॅकवर येऊ शकते.’

५१% हिस्सेदारी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे राहील, महिला संचालकाच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे प्रक्रिया बोलीची संपूर्ण प्रक्रिया व्यावसायिक संचालक मीनाक्षी मलिक यांच्या नेतृत्वात पूर्ण केली जात आहे. कंपनीचे अधिकारी १४ डिसेंबरला संपणाऱ्या बोली प्रक्रियेत सहभागी होतील. क्वालिफाइड बिडर्स कोण हे २८ डिसेंबरपर्यंत कळेल. ही योजना यशस्वी ठरली तर कर्मचारी व्यवस्थापन कन्साॅर्टियमकडे एअरलाइन्सची ५१% हिस्सेदारी राहील, तर फायनान्सरकडे ४९% हिस्सा राहील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser