आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Image Of The Party Became Disoriented, Shashi Tharoor Demanding Full time President ; Today Marks Sonia's Year As Interim President

काँग्रेस:पक्षाची प्रतिमा दिशाहीन अशी झाली, पूर्णवेळ अध्यक्ष हवा, नेते थरूर यांची मागणी; सोनियांची आज अंतरिम अध्यक्षपदाची वर्षपूर्ती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी यांच्या सल्ल्यावर काम नाही

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींना सोमवारी एक वर्ष पूर्ण होणार आहे. एक वर्षात काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्यात यश आलेले नाही. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षांची गरज आहे, असे पक्षाचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.

थरूर रविवारी म्हणाले, काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असल्याची धारणा आता लोकांमध्ये दिसून येत आहे. ती बदलण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया गतिमान केली पाहिजे. त्यांच्याकडून अनिश्चित काळासाठी अंतरिम अध्यक्षपद जबाबदारीची अपेक्षा करणे योग्य होणार नाही. राहुल गांधी पक्षाची धुरा सांभाळू शकतात. त्यांच्यात तसे नेतृत्व आहे. त्यांनी केवळ आपला राजीनामा परत घ्यावा. कारण डिसेंबर २०२२ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. मात्र, राहुल अध्यक्ष होऊ इच्छित नसल्यास पक्षाने निवडीची कवायत नव्याने सुरू करायला हवी. आपण जनतेमध्ये निर्माण झालेली प्रतिमा पुसून टाकली पाहिजे. काँग्रेस भरकटली आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विराेधी पक्षाची भूमिका नेमकेपणाने निभावू शकत नाही असे लोकांना वाटते याकडे थरूर यांनी लक्ष वेधले.

राहुल गांधी यांच्या सल्ल्यावर काम नाही

राहुल यांनी ३ जुलै २०१९ रोजी पक्षातील सुधारणांसाठी काही सल्ले दिले होते. त्यावर पक्षात अद्यापही अंमलबजावणी किंवा काही निर्णय झालेला नाही. या गोष्टींचे राहुल यांना वाईट वाटते. पक्षाच्या पराभवासाठी कोण कोण जबाबदार आहे याचे जाबदायित्व निश्चित करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी स्वत: याची जबाबदारी घेतली होती. परंतु यूपीए-२ च्या काही मंत्र्यांनी जबाबदारी घेतली नव्हती. त्याशिवाय राहुल यांनी नवीन अध्यक्ष निवडीसाठी एका समितीची स्थापना केली होती. या दिशेनेदेखील काही काम झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...