आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Incidence Of Landslides, Heavy Rains, Hailstorms, Cloudbursts Increased 20 Times In 10 Years, Rain That Occurred In 3 Days Is Now In 3 Hours; News And Live Updates

हवामानात बदल:भूस्खलन, मुसळधार पाऊस, गारपीट, ढगफुटीच्या घटनांमध्ये 10 वर्षांत 20 पटीने वाढ; 3 दिवसात पडणारा पाऊस 3 तासांत पडतो

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नौतापात उष्णतेच्या अभावामुळे पावसाळ्यावर परिणाम होतो

वर्षातील सर्वात जास्त उष्ण दिवस म्हणून ओळखले जाणारे नऊ दिवस म्हणजेच नौतापा हे बुधवारी संपले. यामध्ये सर्वात जास्त तापमान राजस्थानमधील कोटा शहरात नमूद करण्यात आले आहे. जवळपास 10 वर्षांनंतर ही परिस्थिती उद्भवली असून नौतापामध्ये कोटाचा तापमान 43 अंश इतके होते. हवामान तज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत हवामानाच्या बदलत्या घटनांमध्ये 20 पटीने वाढ झाली आहे.

त्यामध्ये भूस्खलन, मुसळधार पाऊस, गारपीट, ढगफुटी घटनांचा समावेश आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळ, दुष्काळ, पुरजन्य जिल्ह्यांत वाढ होत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. कारण 1970-2005 दरम्यान 250 घटना घडल्या होत्या तर 2005-2020 मध्ये 310 घटना घडल्या.

स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पहलवत म्हणतात की, हवामानाच्या या बदलत्या परिस्थितीला आपण याप्रकारे समजू शकतो. आधी केरळ आणि मुंबईत पूर यायचे परंतु, आता राजस्थान आणि गुजरातमध्येदेखील पूर यायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी पावसाळ्यात सतत चारही महिने नियमित पाऊस पडायचा त्यामुळे पाणी जमिनीत खोलपर्यंत मुरायचे. पण आता मुसळधार पाऊस होत असल्याने ते ताबडतोब नदीत मिसळून जाते.

यामुळे पाण्याच्या पातळीतदेखील घट पाहायला मिळत आहे. भलेही पावसाच्या प्रमाणात फारसे बदल झाले नसले तरी पावसाचे सरासरी दिवस मात्र कमी झाले आहे. कारण यापूर्वी जे पाणी 3 दिवसात पडायचे ते आता 3 तासांतच पडत आहे.

जेथे पूर तेथे दुष्काळही पाहायला मिळत आहे
जर एका दिवसात 2.4 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर त्याला रेनी डे असे म्हणतात. यापूर्वी 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 122 दिवसांत लाँग पीरियड अॅव्हरेज (LPA) सुमारे 880 मिमी पाऊस पडायचा. सध्याच्या काळातही पावसाच्या प्रमाणात फारसे बदल झालेले नाही. परंतु, आधी पावसाचे 122 दिवस असायचे ते कमी होऊन आता 60 दिवसांवर आले आहे. अशावेळी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते, परंतु अवकाळी पाऊस आणि जोरदार उष्णता यामुळे दुष्काळाची परिस्थितीही याठिकाणी तयार होऊन जाते.

नौतापात उष्णतेच्या अभावामुळे पावसाळ्यावर परिणाम होतो
हवामान तज्ज्ञ डीपी दुबे म्हणतात की, नौतापाच्या महिन्यात तापमानचे आकडे जास्त राहिल्यास पावसाळादेखील चांगला राहतो. परंतु, यावर्षी तापमानाची आकडेवारी ही 2011 पेक्षा ही खाली गेलेली पाहायला मिळाली असल्याचे ते म्हणाले. नौतापामध्ये जर तापमान कमी असेल तर त्याचा पावसाळ्यावर परिणाम होतो असेदेखील दुबे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...