आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Incurable Disease Deprived Him Of His Legs But He Remained Confident; Now The Message Of Driving 3100 Km ... Victory Without Giving Up

धैर्याची चाके:असाध्य रोगाने पाय हिरावले पण आत्मविश्वास कायम; आता 3100 किमी ड्राइव्ह करत देणार संदेश... हार न मानणेच विजय

चंदीगड.21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे आहेत अभिषेक त्रिवेदी व त्यांच्या पत्नी ऋचा. अभिषेक १९ वर्षांचे असताना त्यांना मल्टिपल स्कलेरोसिस हा असाध्य आजार झाला. यूपीएस्सी प्री पास केली, पण आजार वाढल्याने पुढची तयारी करू शकले नाहीत. त्याच काळात ते ऋचा यांना भेटले. आजाराची माहिती असतानाही त्यांनी लग्न केले... पावलोपावली साथ दिली. दर ३ महिन्यांत आयुर्वेदिक उपचारासाठी केरळला जाणारे अभिषेक आता चंदीगड ते केरळ ३१०० किमी स्वत: कार चालवत जातील. १४ जूनपासून सुरू होणाऱ्या या प्रवासाचा उद्देश अशा आजारांपासून पीडितांना प्रेरित करणे आहे. बँकेत काम करणाऱ्या अभिषेक यांच्या ऑटोमॅटिक कारचे ब्रेक व अॅक्सिलरेटर हाताने कंट्रोल होते. कंटेंट : मनोज अपरेजा

बातम्या आणखी आहेत...